एक्स्प्लोर

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात, मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती

NEET Paper Leak Case : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच, नाशिकच्या शुभम खैरनार याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे यास विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे.

Nashik NEET Paper Leak: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच, नीट परीक्षा पेपर फुटीनंतर (NEET Paper Leak Crime Case) राज्यात देखील कारवाई सुरू झाली असून, नाशिकच्या शुभम खैरनार याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे यास विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील रहिवासी असलेला व सध्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास असणारा धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. धनंजयला राहुरीतून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्थानिक वरिष्ठ पोलिसांना मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, काल (12 मे) CBI पथकाने राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर या मूळगावी चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यानंतर मध्यरात्री कारवाई केल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत कुटुंबीय सध्या कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाही. मात्र धनंजय यांच्या वडिलांनी मुलाला राहुरीतून ताब्यात घेतले नसल्याचं सांगितले आहे.

Nashik Crime : नाशिकच्या शुभम खैरनारची कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर

दुसरीकडे या निट प्रकरणातील नाशिक मधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलीसांनी गावठी पिस्टल जप्त केले होते. शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलीसांनी या प्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. भावेशने दहशत माजवण्यासाठी पिस्टल खरेदी केली होती, अशी प्राथमिक माहिती तपासात समोरली होती. भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानूसार भावेश आणि त्याच्या साथीदाराविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर भावेश खैरनार सध्या जामिनावर मुक्त असल्याची माहिती आहे.

Pune Crime News : विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत, पुणे पोलिसांनी महिलेला केली अटक

NEET पेपरप्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. यात विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्या हि महिला मदत करत आल्याचा संशय पोलिसांना आहे. NEET पेपरप्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला आहे. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला हि महिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

Pune Crime : मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोण आहे धनंजय लोखंडे ? (Who is Dhananjay Lokhande?)

धनंजय निवृत्ती लोखंडे

वय - 26

राहुरी तालुक्यातील माहेगाव - महाडूक सेंटर मूळ गाव..

वडील शैक्षणिक संस्थेत क्लार्क

दोन भाऊ , मोठा भाऊ देखील डॉक्टर..

शिक्षण - B.A.MS.. कर्नाटक राज्यातील मंगळूरु विद्यापीठ..

दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण

मेडिकल ऍडमिशनसाठी पुण्यात कन्सल्टिंग करत असल्याची प्राथमिक माहिती..

वाघोली, पुणे येथे वास्तव्यास होता आणि तिथेच प्रॅक्टिस करत असल्याची माहिती..

गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास.

गावाकडे क्वचित यायचा..

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
Embed widget