NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
NEET Paper Leak 2026: नीट पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे.

NEET Paper Leak 2026: नीट पेपर फुटीप्रकरणी (NEET Paper Leak Case) आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. जयपूरमधून तीन, गुरुग्राममधून एक, नाशिक आणि अहिल्यानगरमधून एक आशा एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. तसेच मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधून शुभम खैरनार (shubham khairnar), अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे (dhananjay lokhande), जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शुभम खैरनारने करिअर काऊन्सिलिंगच्या नावाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे वर्तुळ तयार करून पेपरफुटीत ‘एन्ट्री’ केल्याची माहिती आहे. पुण्यातून त्याच्याकडे कुरिअरद्वारे पेपर पोहोचल्यानंतर शुभम खैरनारने टेलिग्रामवर हरियाणात त्याची विक्री केल्याचे तपासातून समोर आले आहे. धनंजय लोखंडे हा पुण्यात असताना त्याने कुरिअरद्वारे खैरनार याला नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर खैरनारने हरियाणा येथे टेलिग्रामद्वारे विक्री केली. दरम्यान, शुभम बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षाला असून, करिअर कौन्सिलर म्हणून तो कार्यरत होता. शुभमने धनंजयकडून 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केल्यानंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मध्यस्थीला 15 लाखांत विक्री केल्याचीही माहिती मिळाली आहे. (NEET Paper Leak Case)
आतापर्यंत एकूण सहा जणांचे जबाब नोंदवले- (NEET Paper Leak Case)
NEET पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शनच्या चौकशीला आता अधिक वेग आला असून, पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. यापूर्वी चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. काल उशिरापर्यंत आणखी दोन जणांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत एकूण सहा जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या प्रकरणात संशयाच्या केंद्रस्थानी असलेल्या खासगी क्लासेसची पोलिसांकडून सखोल छाननी सुरू आहे. ...परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हस्तलिखित पेपरची निर्मिती नेमकी कोणी केली. तो कुठून आला आणि त्यामागे कोणाचा सहभाग होता याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या हस्तलिखित पेपरमधील अनेक प्रश्न NEET(UG)-2026 च्या प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
शुभम खैरनारच्या घरी छापा- (NEET Paper Leak 2026)
शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरासोबत तो नाशिकमध्ये भाड्याने राहत असलेल्या घरी छापा टाकण्यात आला. आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. नांदगावमध्ये आरोपी शुभम खैरनारच्या घराची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. या कारवाईत काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शुभम खैरनारला दिल्लीतील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात इतर आरोपींचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत, त्यांचा शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. त्यामुळे आरोपी शुभम खैरनारच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. शुभम खैरनारच्या भावालाही सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर भावेश खैरनारला सोडून देण्यात आलं. नांदगाव येथील घराची झडती घेण्यासाठी आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं होतं.
नीटची परीक्षा रद्द का झाली? (why neet exam 2026 cancle?)
- राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी 'गेस पेपर'चे वितरण
- 'गेस पेपर'मध्ये एकूण 410 प्रश्न होते
- 'गेस पेपर'मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
- नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
- प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
- प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
पुण्यातून आणखी एक ताब्यात, एजंट ओंकार शिंगोटे पोलिसांच्या जाळ्यात, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!























