NEET Exam 2026 Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची (NEET Exam 2026 Paper Leak) व्याप्तीदिवसागणिकवाढतअसून NEET पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून राज्यभरातमोठ्याकारवाईचंसत्रसुरुआहे. अशातचआतायाप्रकरणातआणखीदोघांनांअटककरण्यातआलीआहे. याप्रकरणातीलहि बारावी आणि तेरावी अटक आहे. GOD म्हणून नंबर save केलेल्या तेजस शाह या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक करण्यातआलीआहे. या विद्यार्थ्याने मनिषा हवालदारकडून पेपर घेतल्याचेउघडझालेआहे.

Continues below advertisement

NEET Exam 2026 Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणाती तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच

दरम्यान, याप्रकरणातील तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच करण्यातआलीआहे. पुण्यातून सीबीआने अटक करण्यात आलेला हा आरोपी बालरोगतज्ज्ञ असून डॉक्टर मनोज शिरुरे (Manoj Shirure) असं त्याच नाव आहे. डॉ. मनोज शिरूरे सीबीआय अटकेत असून आता थोड्या वेळापूर्वी अटककरण्यातआलीआहे. तर विद्यार्थी तेजस शाह याला काल अटककरण्यातआलीअसूनतोबारावा अटकेतीलआरोपीआहे.

Continues below advertisement

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई; आतापर्यंत 13 आरोपी अटकेत (NEET Exam 2026 Paper Leak)

देशासह राज्यभरातगाजतअसलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात CBIने आणखी 2 आरोपींना अटक केली असून एकूण अटक आरोपींची संख्या 13 वर पोहचलीआहे. लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांनाहीयाप्रकरणी अटक करण्यातआलीआहे. रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर पुण्यातील APMA कोचिंग संस्थेतील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांनाही अटक करण्यातआलीआहे. त्याच्यावर भौतिकशास्त्राचे लीक प्रश्न मिळवल्याचा आरोप करण्यातआलाआहे. देशभरातील 49 ठिकाणी CBI ने छापे टाकलेअसून तपासात अनेक कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यातआलेआहे. यात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 13 आरोपी अटकेत आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा तपासात दावा करण्यातआलाआहे. पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट आणि कटकारस्थान उघड करण्यासाठी CBIचा तपास सुरू आहे.

कोण आहे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे? (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

लातूर शहरात NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची कारवाई आणखी वेगाने सुरू असून, RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या CBI पथकाने काल संध्याकाळी जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे पोहोचले. हे रुग्णालय बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचे आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. 

नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, काय काय घडलं? (NEET Exam 2026 Paper Leak)

नीटच्या पेपर फुटीचा कट शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar) त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणार्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वत:च्या मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI