Navneet Rana : 'हिंदू शेरनी तू कुछ दिनों की मेहमान, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना...'; नवनीत राणांना पाकिस्तानमधून धमकी
Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Navneet Rana : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पाकिस्तानमधून (Pakistan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station) तक्रार दाखल करत, संबंधित धमकी कॉल्सबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या कॉलमध्ये म्हटले आहे की, "हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी", या धमकी देण्यात आली आहे. राणा यांच्यावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्या मोबाईलवरही या प्रकारचे कॉल आले असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Vs Pakistan) सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकीचा कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे. तर मागील वर्षी देखील नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूरनंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल वक्तव्य केले होते. "घरात घुसून मारले आहे, तुमचं कब्र आधीच तयार आहे. दिल्लीच्या गद्दीवर तुमचा बाप मोदी बसला आहे. काय बोलता छोटे पाकिस्तान, बकरीच्या आईला किती काळ सुरक्षितता मिळेल? एक एक करून मारू. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करते. 'घरात घुसून मारले' हे काय असतं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे, असे त्यांनी म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या



















