Navi Mumbai Crime News:  आधी मुस्कान, मग प्रियंका, त्यानंतर सिया आणि आता सुनिता... आपल्याच पतीचा काटा काढणाऱ्या महिलांच्या (Navi Mumbai Crime News) या यादीत आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. आपल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या (Navi Mumbai Crime News) केल्याची ताजी घटना नवी मुंबईतील ऐरोली परिसरात समोर आली आहे.(Navi Mumbai Crime News)

Navi Mumbai Crime News: असा रचला हत्येचा कट

ही घटना जवळपास ११ महिन्यांपूर्वीची आहे. सुनिता कुशवाहा हिचे राहुल प्रजापती नावाच्या एका रिक्षावाल्यासोबत प्रेमसंबंध होते. पती बळीराम हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने सुनिताने प्रियकराच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री सुनिताने मुलांना नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर बळीराम गाढ झोपेत असताना आरोपीने त्याची गळा दाबून हत्या केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला.

Navi Mumbai Crime News: पुराव्यांची विल्हेवाट आणि पलायन

गुन्ह्याचा कोणताही सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी बळीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हे तुकडे पोत्यात गुंडाळून प्रियकर राहुलच्या ऑटो रिक्षातून गवळीदेव डोंगरावरील जंगलात नेण्यात आले आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या हत्याकांडानंतर सुनिताने तिचे वडीलोपार्जित घर भाड्याने दिले आणि मुलांसह नवी मुंबईतील घणसोली भागात राहायला आली.(Navi Mumbai Crime News)

Navi Mumbai Crime News: असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश

हा संपूर्ण गुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत लपून राहिला होता. मात्र, बळीरामचा भाऊ जेव्हा सुनिताला त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारायचा, तेव्हा ती टाळाटाळीची उत्तरे द्यायची. सुनिताच्या वागण्यावर संशय आल्याने अखेर बळीरामच्या भावाने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

Navi Mumbai Crime News: सिम कार्ड बदलूनही पोलीस पोहोचले आरोपींपर्यंत

पकडले जाऊ नये म्हणून दोन्ही आरोपींनी वारंवार आपली सिम कार्ड्स बदलली होती. परंतु, पोलिसांना त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) द्वारे त्यांच्यातील संवादाचा सुगावा लागला आणि पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या कडक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गवळीदेवच्या जंगलातून मृतदेहाचे काही अवशेष ताब्यात घेतले असून, इतर भागांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai crime News: नेमकं काय आहे प्रकरण?

ऐरोली परिसरात एका महिलेने तिच्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीने पतीला निर्घृणपणे संपवलं. तिने एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, धक्कादायक बाब म्हणजे, या महिला आरोपीने तब्बल ११ महिने हा गुन्हा पचवला होता, मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पत्नी सुनीता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाह असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.(Mumbai Crime News)

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या थरारक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून गवळी देव डोंगर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयताचा भाऊ संशय व्यक्त करत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चौकशीतील विसंगतींच्या आधारे या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. आरोपींच्या कबुलीनंतर गवळी देव परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.