Navi Mumbai Crime News: नवी मुंबई : पिल्लू तुला आता दोन मिनिटं त्रास होईल. पण दुसऱ्या जन्मात नक्की भेटू, अशा आना भाका घेत प्रियकराने (love) प्रियसिला संपवलं आणि नंतर स्वत:ही ट्रेन खाली उडी मारली. ही कहाणी कुठल्या क्राईम वेब सीरीजची (Web series) किंवा क्राईम पेट्रोलची नाहीये, तर नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमध्ये ही घटना घडली आहे. वैभव बुरुंगले आणि वैष्णवी बाबरचं एकमेकांवर प्रेम होतं. पण घरच्यांच्या विरोधामुळे वैष्णवी वैभवला टाळाटाळ करत होती, त्यामुळेच वैभवने वैष्णवीला संपवून स्वत: आत्महत्येचा निर्णय घेतला. वैष्णवी माझी झाली नाही तर तिला कुणाचीच होवू देणार नाही, या भावनेतून त्याने तिला मारुन टाकलं. या गुन्ह्याची उकल झाली आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली.


घटनेचा उलगडा आता झाला असला तरी ही घटना आहे 12 डिसेंबरची आहे. वैभवने खारघरच्या टेकडी परिसरात वैष्णवीला भेटायला बोलावलं. दुपारी तिची हत्या केली आणि संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी मारुन स्वत:ही आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने व्हाईस नोट रेकॉर्ड केली. ज्याच्या आधारे या घटनेचा छडा लागला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणं काही गुन्हा नाही. पण हेच जीवापाड प्रेम जीव घेईपर्यंत पोहोचलंय, हे प्रकरण पाहून प्रेमाची ही कसली शिक्षा? एवढंच म्हणावं लागेल. 


लग्नाला घरच्यांचा विरोध - 


वैभवनं जीवापाड प्रेम असलेल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. लग्नाला होत असलेला विरोध पाहता त्यानं हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. एवढंच नाहीतर प्रियकरानं प्रेयसीला संपवून स्वतःही रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केली आहे. आती ती आपली होणारच नाही, माझी नाहीतर मग ती दुसऱ्या कोणाचीच होऊ शकत नाही, या रागातून प्रियकरानं प्रेयसीला संपवलं आहे.लग्नाला होत असलेला विरोध पाहता ती आपली नाही तर कोणाचीच नाही या भावनेतून प्रियकर असलेल्या वैभवनं वैष्णवीची हत्या करत स्वत:ही आत्महत्या केली. प्रियकर युगलाचा दुर्देवी अंत झाला असून पोलिसांना एक महिन्यानंतर मुलीची बॅाडी शोधण्यात यश मिळालं आहे.


ती माझी होणार नसेल तर कोणाचीच नाही -


नवी मुंबईतील कळंबोली येथे राहणारा चोवीस वर्षीय वैभव बुरूंगले आणि एकोणवीस वर्षीय वैष्णवी बाबर यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही जवळच राहणार असल्यानं प्रेमाचं रूपांतर दोघांना लग्नात करायचं होतं. मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी भेटू नये, असा समज घरच्यांनी दिला होता. यामुळे वैष्णवी हिनं वैभवला टाळण्यास सुरुवात केली असल्याचं लक्षात आल्यानं वैभवनं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. वैष्णवी माझी होणार नसेल तर कोणाचीच होणार नाही या भावनेतून वैभवने तिला 12 डिसेंबर रोजी खारघर डोंगराच्या निर्जनस्थळी आणून तिचा खुन केला. गळा आवळताना पिल्लू दोन मिनिट त्रास होईल. मात्र आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करून भेटू असे म्हणत वैभवने तिचा गळा आवळला. ही व्हाईसनोट पोलीसांना वैभवच्या मोबाईलमध्ये मिळाली. 


प्रियसीला संपवण्याआधी अनेकदा रेकी - 


12 डिसेंबर रोजी  वैष्णवीची दुपारी हत्या केल्या नंतर वैभवने संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या आधी त्याने आपल्या मोबाईल मध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती. वैष्णवीची हत्या ओवेकॅम्प गावच्या मागे केल्याचे लिहिली होते. हत्येआधी अनेक वेळा या ठिकाणी येवून त्याने रेकी केल्याचे मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट होत होते. पोलीसांनी हा संपुर्ण परिसरात शोध मोहिम हाती घेतली असता डी कंम्पोज झालेली बॅाडी पोलीसांच्या हाती लागली.