एक्स्प्लोर

नाशिकमध्ये FDI अधिकारी असल्याचे सांगत ट्रक लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; तपासात निघाले 'खबरी'लाल

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नाशिकच्या येवला येथून सुपारी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

नाशिक : सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील काही दिवसांपूर्वी स्वत: भेसळची पाहणी करताना गाड्या अडवल्याचं दिसून आलं. आता, नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या येवला तालुक्यातून तीन बोगस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत या तोतया अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाकडून पैशांची मागणी करत ट्रकच लुटण्याचा घाट घातला होता. मात्र, पोलिसांनी (Police) तोतया अधिकाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नाशिकच्या येवला येथून सुपारी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी सुपारी घेऊन जाणाऱ्या आणखी दोन ट्रक लुटण्याचा प्रयत्न केल्याने अन्न व औषध प्रशासनाची कारवाई चर्चेत आली आहे. अन्न औषध प्रशासनाने केलेले कारवाई ही येवला परिसरात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं तर पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत लुटण्यात आलेले ट्रक हे देखील येवल्यातूनच ताब्यात घेतल्याचा पोलिसांनी सांगितले त्यामुळे या कारवाईने आता संभ्रम निर्माण झाला असून पुढील तपास नाशिक पोलीस करत आहे.

तिघेही निघाले खबरी

येवला टोलनाक्याच्या शंभर मीटर परिसरातून तिघांनी दोन ट्रक अडवून ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, तोतया अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाचे कागदपत्र, मालाचे कागदपत्र, मोबाईल आणि सोळा हजार रुपये कॅश काढून घेतली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून ही ट्रक लुटण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या उद्योग भवन येथील अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर त्या ट्रक आणण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे ट्रकची लूट करणारे हे तिघे अन्न व औषध प्रशासनाचे खबरी असल्याचे तपासातून समोर आले आहे. ट्रक मालकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खोलात जाऊन माहिती विचारल्यानंतर हे सत्य समोर आले. शहरातील गरवारे पॉईंट येथून ताब्यात घेतले, निफाड येथून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ट्रक देखील ताब्यात घेतला अशी माहिती देण्यात आली आहे. 
चारुदत्त भिंगारकर, मयूर दिवटे आणि नवीन सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, उद्यापर्यंत (17 मे) त्यांना पोलीस कोठडी देण्यात आले आहे. पोलिसांनी दरोडाच्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा

भारतीय सैन्य मोदींच्या चरणी नतमस्तक आहे; उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद, व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: मोठी बातमी: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
Mumbai Crime News: संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना
संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा
मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Pune Hospital Bomb Case : हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
Ambernath Nagar Parishad: अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
Embed widget