एक्स्प्लोर

Nashik TCS Crime: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला अखेर अटक; मोबाईलसह महत्त्वाचे तांत्रिक पुरावेही जप्त, विदेशी फंडिंगसह इंटरनॅशनल कनेक्शन?

Nashik TCS Crime : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्यसूत्रधार असलेली संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे.

Nashik TCS Crime News : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार असलेली संशयित आरोपी निदा खानला (Nida Khan) अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून(Chhatrapati Sambhajinagar) अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेली आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खान अखेर अटक करण्यात आली आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांकडून अनेक पथकं तैनात करत तिचा राज्यभर शोध घेतला जात होता. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे. 

Nashik TCS Crime News : मोबाईलसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त

दुसरीकडे, निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून मोबाईलसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त केले आहे. यात दोन स्मार्टफोन नाशिक पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. रात्री उशिरा निदा खानला संभाजीनगर येथून नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन्समधून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशिरा छत्रपती संभाजी नगर गुन्हे शाखा आणि नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने निदा खानला नाशिकमध्ये आणले. TCS महिला लैंगिक अत्याचारासह मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावणे याप्रकरणी निदा खानवर गुन्हा दाखल आहेत. दरम्यान, 25 मार्च पासून निदा खान फरार होती. निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके मागावर होती. अखेर छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी तिला अटक केली आहे. तर ताब्यात घेतल्यानंतर नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिला आणण्यात आलं. सध्या पोलीस कायदेशीर अटकेची कार्यवाही करत आहे.

Nashik TCS Crime : विदेशी फंडिंगसह , इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचाही संशय

महिला लैंगिक अत्याचारातील आरोपींना मदतीसह धर्मांतरासाठी निदा खान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे. निदा खानला अटक केल्यानंतर TCS प्रकरणातील SIT तपासाला आता गती मिळणार आहे. सोबत टीसीएस प्रकरणात विदेशी फंडिंगसह , इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचाही संशय पोलिसांना आहे.

Nashik TCS Crime News : नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर येथून ठोकल्या बेड्या

नाशिक टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांनी नाशिकमध्ये आणत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अटकेची कारवाई पूर्ण केली. निदा खानचा ताबा नाशिक पोलिसांना देऊन संभाजीनगर पोलीस संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले.नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाईची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

इतर महत्वाच्या बातम्या

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Shivani Kalmekar Case : 'होय, पोलिसांचीच मोठी चुकी...!' बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पोलीस महासंचालकांची कबुली, मारेकरी अद्याप मोकाटच
'होय, पोलिसांचीच मोठी चुकी...!' बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पोलीस महासंचालकांची कबुली, मारेकरी अद्याप मोकाटच
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Atal Setu Navi Mumbai Crime News: जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं!
जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Maharashtra Live blog updates: नसरापूर प्रकरणात महत्त्वाची साक्ष, सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि आरोपी एकच
Maharashtra Live blog updates: नसरापूर प्रकरणात महत्त्वाची साक्ष, सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि आरोपी एकच
Embed widget