Nashik TCS Case Nida Khan Crime : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात (TCS Crime Case) आरोपी असलेली निदा खान (Nida Khan) हि एमआयएम नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळं मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय, त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधले आहे. त्या घराला महापालिकेने नोटीस दिली असून त्यांच्या घरावर देखील महापालिकेने नोटीस चिटकवली आहे. परिणामी 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरे राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसलाही अतिक्रमणाचा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळं आता मतीन पटेल विरोधात महापालिकाही आक्रमक झाली असल्याचे चित्र आहेNashik TCS Case Nida Khan Crime.
Nashik TCS Case Nida Khan Arrested: नगरसेवकाचा 'तो' फ्लॅट अन् निदाचा मुक्काम
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.
Asaduddin Owaisi on Nashik TCS Case: व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का?
निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. यावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधाऱ्यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय.
निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्यानंतर त्यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याबाबत विचारले असता आजपर्यंत किती आमदार-खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. तर व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
Asaduddin Owaisi : बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं?
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, टीसीएसचे स्टेटमेंट आपण पाहिले असेल. निदा खानचा एचआरशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर होण्यापूर्वी निदा खानची बदली झाली होती. काही लोक मीडिया ट्रायल करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं? आमचा न्यायालयावर विश्वास आहे. निदा खानवरील आरोप टिकणार नाहीत. केवळ द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असं नाही. एमआयएमला टार्गेट करा, काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
