Ashok Kharat Crime News :स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणूनमिरवणाऱ्या नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. याप्रकरणाचाजसजसातपासपुढे सरकतोयतसेभोंदूबाबा खरातचे नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असल्याचेचित्रआहे. दुसरीकडेराज्यातखळबळउडवणाऱ्या भोंदूबाबा प्रकरणावरुन (Ashok Kharat Crime Case) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या स्वयंघोषित ज्योतिषी खरातचंअनेकउच्चपदस्थअधिकारीआणि अनेक राजकीय नेत्यांसोबतसंबंधअसल्याचेआतासमोरआलेआहे. तरसध्याअनेक फोटोहीसमाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या होत्या. मात्र, पोलिसांकडून त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे आरोपकेलं जात आहे. अशातचयाप्रकरणातअनेकांचंनावगोवल्याजाण्याच्याभीतीपोटीआता खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी एक फोटो पोस्ट करत यासंदर्भात मोठा आरोप केला आहे. (Ashok Kharat Crime Case)
Trupti Desai : नेमकंकायम्हणाल्या तृप्ती देसाई?
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपल्यासोशलमीडियावरएकफोटोपोस्टकरतम्हटलंआहेकि, नाशिकचे "IG दत्तात्रय कराळे" यांच्याबरोबर कॅप्टन अशोक खरात याचा फोटो मला आत्ता प्राप्त झाला आहे. मागील वर्षी अशोक खरात याच्यावर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही? कारण नाशिक परिक्षेत्राचे IG दत्तात्रय कराळे होते. त्यामुळे खरातला पाठीशी घालण्यात आले, अशी आत्ताच मला फोनवरून माहिती मिळाली आहे...सगळंच अवघड आहे, महिलांबाबत असे वागणाऱ्या माणसाला कसं काय कोण पाठीशी घालू शकतं? असासवालही तृप्ती देसाई यांनी यावेळीकेलाआहे.
Ashok Kharat Case: नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरातवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. सुरुवातीला या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात ही संख्या वाढून सुमारे 100 व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. आता अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
