एक्स्प्लोर

Nashik Crime : माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले

Nashik Crime : इन्कम टॅक्स विभागाची रेड पडल्याचे सांगून तिघांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

Nashik Crime : फसवणूक आणि अपहार करून उकळलेल्या पैशांतून नाशिकमध्ये हायप्रोफाईल जीवनमान जगणाऱ्या 'ब्रोकर' दाम्पत्याने नाशिकमधील तिघांकडून सव्वा दोन कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने माझ्या घरी टाकलेल्या छाप्यात सहा कोटींची 'कॅश' जप्त करुन आमचे 700 कोटींचे व्यवहार फ्रिज्ड केले आहेत, असे सांगून घरखर्चासाठी किमान पैसे द्या, असे आर्जव करून दोघांनी मदतीच्या बहाण्याने हे पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, शहर आर्थिक गुन्हेशाखेने संशयित ऋषिराज टेकाडे याला अटक केली असून त्याची पत्नी संशयित रविना टेकाडे हिचा शोध सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील परमोरी (पोस्ट अवनखेड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर संपतराव तिडके हे इन्व्हेस्टमेंट ब्रोकर असून त्यांची ओळख सन 2024 मध्ये ऋषिराज याच्याशी झाली होती. यानंतर ओळख वाढत गेल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत गेले आणि टेकाडे व तिडके कुटुंबांचे हितसंबंध वाढत गेले. 

घरखर्चासाठी पैसे द्या

जानेवारी 2025 मध्ये ऋषिराज याने तिडके यांना भेटून 'माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, त्यात माझे व पत्नीचे सर्व बँक खाते फिज्ड (गोठविण्यात) केले आहेत. माझ्या मालमत्ता देखील जप्त केल्या असून छापा कारवाईत आयटीने घरातून सहा कोटी रूपये जप्त केले आहेत असे सांगितले. तसेच, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर सातशे कोटींचा बॅलन्स असताना तो काढण्यास अडचण येत आहे. यातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे, कठीण झाल्याने पन्नास लाख रुपये उसनवार द्यावेत अशी मागणी केली. 

संशयित पोलिसांच्या ताब्यात 

त्यामुळे तिडके यांनी व्यावसायिक व कौटुंबिक हितसंबंधातून टेकाडे दाम्पत्यासह त्यांच्या तीन ते चार एजंटाकडे वेगवेगळ्या कालावधीत एकूण 65 लाख 39 हजार रुपये दिले. त्यापैकी फक्त एक लाख तीस हजार रुपये टेकाडे याने परत केले आहेत. बरेच दिवस उलटूनही 64 लाख रुपये मिळत नसल्याने त्यांनी तगादा लावला, मात्र टेकाडे याने नानाविध कारणे सांगून वेळ मारून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिडके यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. दरम्यान, फसवणुकीतील रक्कम अडीच कोटींच्या घरात अस‌ल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, कोल्हे यांनी ऋषिराज टेकाडे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याची पत्नी संशयित रविना टेकाडे हिचा शोध सुरु केला आहे. या दाम्पत्याने आणखी दोन जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

आणखी वाचा 

Rohit Pawar: गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडळकर सोलापुरात; तमाशा करून मला अडकवण्याचा प्रयत्न, शरणू हांडे प्रकरणातील आरोपांवर रोहित पवारांचं सणसणीत उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Nandurbar Food poisoning: नंदूरबारमध्ये हृदयद्रावक घटना, भूक लागल्याने चिमुकल्यांनी शेतात पडलेल्या एरंडीच्या बिया खाल्ल्या, 8 जणांना विषबाधा, एका चिमुकलीचा मृत्यू
नंदूरबारमध्ये हृदयद्रावक घटना, भूक लागल्याने चिमुकल्यांनी शेतात पडलेल्या एरंडीच्या बिया खाल्ल्या, 8 जणांना विषबाधा, एका चिमुकलीचा मृत्यू
Mumbai Crime: मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
Mumbai Crime: मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
Embed widget