एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

Nashik Crime News: नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असून, आता एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीतील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

Nashik Crime News: अशोक खरात, रवींद्र एरंडेनंतर तिसरे मोठे प्रकरण

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर रवींद्र एरंडे याने महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना धमकावल्याची घटना ताजी असतानाच, आता कॉर्पोरेट क्षेत्रातील हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: नेमकी घटना काय?

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर 'माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली' असे उपकाराचे ओझे टाकून महिलांना जाळ्यात ओढले. पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.

Nashik Crime News: तब्बल 9 गुन्हे दाखल; पाच जणांना बेड्या

या संवेदनशील प्रकरणात शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळत तपास केला. 25 मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 2 आणि 3 एप्रिल रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी 8 गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nashik Crime News: पोलिसांचा तपास सुरू

नोकरीच्या मुलाखतीपासूनच महिलांना लक्ष्य करण्याची ही पद्धत अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि किती महिला या शोषणाला बळी पडल्या आहेत, याचा कसून तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

आणखी वाचा 

Nashik Crime News: AI चा वापर करून ‘खाकी’चा बनाव, तोतया पोलीस बनून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्...; नाशिकमधील चक्रावणारी घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
पेपरआधीच विक्रीसाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध, छत्रपती संभाजीनगरमध्ये  पेपरफुटीचा प्रकार उघडकीस, शैक्षणिक वर्तुळात खळबळ
पेपरआधीच विक्रीसाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध, छत्रपती संभाजीनगरमध्ये  पेपरफुटीचा प्रकार उघडकीस, शैक्षणिक वर्तुळात खळबळ
धक्कादायक! कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले, पोलिसांकडू तपास सुरु
धक्कादायक! कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले, पोलिसांकडू तपास सुरु
Santosh Deshmukh : संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget