Nashik Crime News: नाशिकमधील टीसीएस  (TCS) कंपनीतील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचे प्रकरण आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले आहे. हे प्रकरण नसून एका 'संघटित कटाचे' स्वरूप असल्याचे निरीक्षण नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) नोंदवले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असून, त्यात परकीय निधी आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

Nashik Crime News: निदा खानचा मोठा गेम

या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिने पीडितेवर दबाव टाकण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये 'इस्लामिक रिलिजिअस ॲप्लिकेशन्स' सक्तीने इन्स्टॉल केले होते. पीडितेचे नाव बदलून ते 'हनिया' करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेला मलेशियातील 'इम्रान' नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा मोठा कट रचला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Nashik Crime News: तपासातील महत्त्वाचे धागेदोरे

पोलिसांनी पीडितेकडील 'बुरखा' जप्त केला आहे. संशयित दानिश शेख याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केला आणि तिचे नाव बदलता यावे यासाठी तिची शैक्षणिक कागदपत्रेही आपल्या ताब्यात घेतली होती. दुसरा संशयित तौसिफ अत्तार याने कामाच्या ठिकाणी पीडितेकडे लैंगिक सुखाची मागणी करत तिला धमकावले होते. या प्रकरणातील मलेशिया 'कनेक्शन' आणि परकीय आर्थिक रसद यांचा शोध आता एसआयटी (SIT) घेत आहे.

Continues below advertisement

Nashik Crime News: न्यायालयाचे कडक ताशेरे

निदा खानने गर्भवती असल्याचे कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. "कायद्यासमोर सामान्य व्यक्ती आणि गर्भवती महिला यांच्यात तपासाच्या बाबतीत फरक केला जाऊ शकत नाही. हा एक संघटित कट असून यात परकीय निधी आणि मालेगाव कनेक्शनचा तपास करण्यासाठी निदाची कोठडीत चौकशी होणे अत्यावश्यक आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Nashik Crime News: संशयित पोलीस कोठडीत, निदा पसार

या प्रकरणी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन हे चार आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांना आज  मंगळवारी (दि. 5) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, मुख्य सूत्रधार मानली जाणारी निदा खान 27 मार्चपासून पसार असून, पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांना निदा खानला पकडण्यात यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: धार्मिक कामासाठी अशोक खरातला आधार-पॅन कार्ड दिलं, पण त्याने...; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा, काय-काय म्हणाल्या?