एक्स्प्लोर

Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!

Nashik Crime News: नाशिकमधील पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. किरकोळ वादातून एका सराईत गुन्हेगाराने सलून व्यावसायिकाला संपवल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील पंचवटी (Panchavati) परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आडगाव नाका (Adgaon Naka) परिसरातील मधुर मिलन स्वीट्ससमोर एका सराईत मद्यपी गुन्हेगाराने किरकोळ वादातून सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार (45) यांचा चाकूने भोसकून जीव घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Nashik Crime News: नेमकी घटना काय?

मयत जयवंत पवार हे जुन्या नाशिकमधील रहिवासी असून त्यांचे अमरधाम रोडवर 'तन्मय मेन्स पार्लर' नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते आपल्या मित्रासोबत बाहेर पडले होते. पहाटे ३:३० च्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र विनोद आगळे आडगाव नाक्यावरून जात असताना, टायर पंक्चरच्या दुकानाजवळ संशयित आरोपी राजा काकवीपुरे हा दारू पीत बसलेला होता. यावेळी विनोद आगळे आणि आरोपी राजा यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक झाली. जयवंत पवार यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आरोपीने त्यांच्याशी झटापट सुरू केली.

Nashik Crime News: बुटातील चाकूने केला वार

झटापट सुरू असताना आरोपी राजा काकवीपुरे याने आपल्या बुटात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला. त्याने केलेला पहिला वार हुकला, मात्र दुसरा वार पवार यांच्या छातीवर वर्मी बसला. हा वार इतका भीषण होता की, पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली आणि एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्यावर 'लिफ्ट' घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

Nashik Crime News: कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

जखमी अवस्थेत पवार यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत जयवंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Nashik Crime News: "पोलिसांचा वचक कमी झाला आहे का?"

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत जयवंत यांच्या पत्नी गीता पवार यांच्या फिर्यादीवरून राजा काकवीपुरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. भरवस्तीत आणि मुख्य नाक्यावर घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमधील सराईत गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

आणखी वाचा 

Ashok Kharat and Rupali Chakankar: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर होणार; चौकशीसाठी पुण्याहून नाशिककडे रवाना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Prasad Vedpathak Video: 'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
Tukaram Mundhe FDA Action : चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
Prasad Vedpathak White Line Controversy: जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Embed widget