Nashik Crime News:नाशिकच्या पंचवटी (Panchavati) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंद चारचाकी (Four-Wheeler) वाहनामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून गाडीतच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरात दुर्गंधी वाढल्यानंतर नागरिकांना संशय आला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित चारचाकीची पाहणी केली असता त्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, संबंधित इसमाचा मृत्यू गुदमरून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास (Investigation) सुरू असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Nashik Crime News: दोन दिवसांपासून मृतदेह चारचाकीत

गेल्या दोन दिवसांपासून मृतदेह चारचाकीत असल्याची माहिती समोर येत आहे. गाडीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संबंधित इसमाचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास आता पंचवटी पोलिसांकडून केला जात आहे. 

Continues below advertisement

Nashik Crime News: पंचवटी परिसरात खळबळ

दरम्यान, मृत इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. चारचाकी वाहन कोणाच्या नावावर आहे, संबंधित इसम या वाहनात कसा आला आणि मृत्यूच्या आधी त्याच्यासोबत नेमके काय घडले, या सर्व बाबींचा तपास केला जाणार आहे. मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालही महत्त्वाचा ठरणार आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Manisha Jejurkar Case: डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी कारवाई, पतीनंतर आता 'त्या' महिला डॉक्टरला अटक, दोघांमधील कनेक्शनचा उलगडा होणार?

Nashik Crime News: आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली आठ महिन्यांची चिमुरडी अचानक गायब; तिसऱ्या दिवशी येवल्यात सापडली, पण 'ती' इतक्या दूर पोहोचलीच कशी? नांदगावमधील प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं