नाशिक : नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेने(Nashik Crime News) नोटीस दिली आहे. सोमवारी पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन पटेलच्या शोधार्थ पथक संभाजीनगरमध्ये होते मात्र, तो मिळून आला नव्हता.दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पथकाने पटेल यास नोटीस (Nashik Crime News) बजावली नोटीस मिळाताच त्याने घेतली नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मतीन पटेल हजर होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. निदा खानला आश्रय देण मतीन पटेलला चांगलंच महागात पडल्याचं दिसून येत आहे, आधी त्याच्या घरावर, ऑफीसवर आणि निदा खान लपलेली त्या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेने कारवाई केली होती.(Nashik Crime News)

Nashik Crime News : नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी जोडल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, सोमवारी ( २५ मे) पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईअंतर्गत पटेलला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नाशिक रोड न्यायालयात मतीन पटेल, निदा खान आणि इतर चार संशयितांविरुद्ध सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने पटेलला थेट नोटीस बजावली, ज्यामुळे त्याने नरमाईची भूमिका घेत पोलिसांसमोर हजर होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांकडून कळते.

Nashik Crime News : घरावर अन् ऑफीसवर कारवाई

या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला जेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांच्या पथकाने नगरसेवक मतीन पटेल यालाही ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याची कसून चौकशी केली होती. मात्र, त्या क्षणी त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल नसल्याने आणि थेट अटक केल्यास त्याला लगेच जामीन मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. आता मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट नोटीस बजावल्याने त्याला स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागणार आहे.

Nashik Crime News : धर्मांतर दबावासोबतच पैशांचीही उकळपट्टी केल्याचा आरोप

तर TCS प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडितेकडून पैसे घेतल्याचे पुरावे SIT पथकाच्या हाती लागल्याची देखील माहिती समोर आली आहे. दानिश शेखने पीडितेकडून २ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा SIT तपासात खुलासा झाला आहे. दानिशचे बँक अकाउंट SIT कडून सील करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात फसवणुकीचे पुरावे जोडले असल्याचे समोर आले आहे. धर्मांतर दबावासोबतच पैशांचीही उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. मतीन पटेल व निदा खान ह्याच्या कनेक्शनची चौकशी सुरू आहे. लवकरच पुरवणी दोषारोपपत्राची शक्यता आहे.