एक्स्प्लोर

Nashik Crime News: अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न, वर्षभरानंतर मुलीची तक्रार; नाशिकमध्ये सासरसह माहेरच्या आठ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Nashik Crime News : मुलीचं वय 14 ते 15 वर्ष असताना वडील आणि मामा, मामी, मावशी, यांनी बळजबरीने या मुलीचा बालविवाह छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील मुलासोबत करून दिलाय.

Nashik Crime News : नाशिकमधून (Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीचं वय 14 ते 15 वर्ष असताना वडील आणि मामा, मामी, मावशी, यांनी बळजबरीने या मुलीचा बालविवाह छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील मुलासोबत करून दिला. मार्च 2025 मध्ये पीडित मुलीचे लग्न झाले. मात्र पीडित मुलीसोबत बळजबरीने होणारे अत्याचार तिला सहन होत नसल्याने या मुलीने नाशिक येथील आडगाव पोलीसात (Crime News) धाव घेतली आणि घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

Nashik Crime News : सासरसह माहेरच्या आठ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल 

दरम्यान, तात्काळ प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मुलीच्या तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. कुटुंबातले सर्व फरार असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र या लग्नानंतर उघडकीस आलेल्या या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed : अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या नवरदेवाचे मंडपातून पलायन, नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा

बीडच्या कपिलधार येथील मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी विवाह सोहळा पार पडला होता. परंतु पोलीस आल्याचे पाहताच नवरदेवाने मात्र मंडपातूनच पलायन केले.

या सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू वराचे आई-वडील जवळचे नातेवाईक वर्हाडी मंडळी यांच्यासह कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असून हे रोखण्यासाठी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतायत. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत.

बीडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हाणामारीच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बीड तहसील परिसरात संपत्ती खरेदी विक्रीतून एका बांधकाम व्यावसायिकाला तीन महिलांनी मारहाण केली. या सर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाला होता. दरम्यान आता याच महिलांकडून पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो. याची खबरदारी म्हणून बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या संरक्षणासाठी लेडी बाउन्सर्स नेमले आहेत.

Beed News : व्यावसायिकाने संरक्षणासाठी ठेवलेल्या लेडी बाऊन्सरची चर्चा

सय्यद सनाऊल्ला रजाउल्ला यांचा बीड शहरात प्लॉट खरेदी विक्री आणि बांधकामाचा व्यवसाय आहे. बीड शहरातील एका जमिनीचा व्यवहार रीतसर करून तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता केली जात होती. याच दरम्यान या खरेदी विक्रीवर आक्षेप घेत काही महिलांनी या बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठूनच मारहाण करत शिवीगाळ केली. याच घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते याचीच धास्ती घेत सय्यद रजाउल्ला यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या घराच्या परिसरात आणि कार्यालयात या लेडी बाऊन्सरची नेमणूक केली. या प्रकरणात दोन्ही गटावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. परंतु एका व्यावसायिकाने संरक्षणासाठी ठेवलेल्या लेडी बाऊन्सरची चर्चा चांगलीच रंगली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Embed widget