एक्स्प्लोर

Nashik Crime News: सात महिला पोलीस, आठ दिवस 'त्या' कंपनीत नियोजनबद्ध काम, कुकर्माचे पुरावे गोळा केले अन्...; नाशिकमधील धर्मांतराच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश?

Nashik Crime News: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणी आणि महिलांना जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक  शोषण आणि धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणी आणि महिलांना जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक  शोषण, विनयभंग आणि धर्मांतर करण्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका नामांकित कंपनीच्या आडून सुरू असलेल्या या 'जिहादी' मानसिकतेच्या कृत्याचा नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अत्यंत गोपनीय आणि धाडसी पद्धतीने तपास करून छडा लावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून, यात दोन महिलांचाही समावेश आहे.

Nashik Crime News: असे चालायचे षडयंत्र

बेरोजगार तरुणींना आकर्षक पगाराचे आमिष दाखवून या कंपनीत नोकरीला ठेवले जात असे. कॉल सेंटरप्रमाणे काम करून घेताना टीम लीडरच्या माध्यमातून या तरुणींवर पाळत ठेवली जात होती. विश्वास संपादन केल्यानंतर विशिष्ट विचारधारेच्या नराधमांकडून तरुणींचा मानसिक छळ, विनयभंग आणि लैंगिक शोषण सुरू झाले. या शोषणामागचा मुख्य उद्देश या तरुणींचे धर्मांतर करणे हाच होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

Nashik Crime News: महिला पोलिसांचे  'अंडरकव्हर' ऑपरेशन

या छळाला कंटाळलेल्या एका धाडसी तरुणीने थेट नाशिक पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 जणांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी स्वतःची ओळख लपवून (Undercover) या कंपनीत नोकरी मिळवली. आठ दिवस त्यांनी तिथे काम शिकले आणि आरोपी कशा प्रकारे मीटिंगमध्ये मुलींवर दबाव टाकतात, त्यांचे शोषण करतात याचे ठोस तांत्रिक पुरावे गोळा केले.

Nashik Crime News: पोलिसांची मोठी कारवाई आणि धक्कादायक खुलासे

पुराव्यांची साखळी पूर्ण झाल्यावर पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून सहा जणांना बेड्या ठोकल्या. एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत, तर एका पुरुषाने धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. 6 अविवाहित तरुणी आणि 2 विवाहित महिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित तरुणींनी या प्रकाराबाबत कंपनीच्या HR विभागाला वेळोवेळी कल्पना दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेऊन 4 तास चौकशी केली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

Nashik Crime News: प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता

"हा प्रकार अतिशय गंभीर असून, पोलिसांनी विशेष पथकामार्फत पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त केले असून तांत्रिक तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे," अशी प्रतिक्रिया  सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे.  

Nashik Crime News: एक महिला आरोपी फरार

सध्या पाच आरोपी पोलीस कोठडीत असून एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: 'तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू', तरुणींना विश्वासात घेतलं अन्...; नाशिकच्या कंपनीतील धर्मांतराची चक्रावणारी माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget