एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार

Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या दिल्लीतील टीमने चौकशीची चक्रे फिरवली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कंपनीची 'झाडाझडती' करण्यात आलीय.

Nashik Crime News: नाशिकमधील (Nashik) एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट असून, आता दिल्लीतील (Delhi) वरिष्ठ पथकाने कंपनीत तळ ठोकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) गेल्या 20 दिवसांपासून फरार असून पोलीस (Police) तिचा कसून शोध घेत आहेत.

Nashik Crime News: 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने चौकशीची चक्रे फिरवली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कंपनीची 'झाडाझडती' सुरू आहे. तपासाच्या काळात कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १५० कर्मचाऱ्यांना सोमवारपासून 'वर्क फ्रॉम होम' कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nashik Crime News: तपासादरम्यान कंपनीत शुकशुकाट

कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक जेव्हा चौकशीसाठी कंपनीत पोहोचले, तेव्हा त्यांना तेथे एकही कर्मचारी आढळला नाही. प्रशासनाने शॉप ॲक्ट लायसन्स आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. अंतर्गत चौकशीत कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यात अनेक गंभीर तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nashik Crime News: निदा खान धर्मांतर रॅकेटची 'मास्टरमाइंड'

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान ही ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. दररोजच्या कामाच्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असे. कामाचे नियोजन देण्याच्या बहाण्याने मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. ज्या महिलांनी विरोध केला, त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यासाठी निदा खान चिथावणी देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हाताळले जात होते, ज्यामुळे यात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे.

Nashik Crime News: निदा खानच्या शोधासाठी तीन पथके रवाना 

मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, ज्यात कंपनीची HR अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. अश्विनीच्या चौकशीतूनच निदा खानच्या मुख्य भूमिकेचा खुलासा झाला आहे. निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Nashik Crime News: राष्ट्रीय महिला आयोगाचा नाशिक दौरा

या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची (NCW) टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. ही टीम पीडित महिलांशी संवाद साधून प्रकरणाची सविस्तर पाहणी करणार आहे.

आणखी वाचा 

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Crime news: जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
NEET Exam Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
Pune Crime Firing Lawrence bishnoi gang: पिंपरी-चिंचवडमधील एजे फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
Missing Link Accident : मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार; तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चार जण गंभीर, वाहतूक विस्कळीत
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चार जण गंभीर, वाहतूक विस्कळीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel and Sharad Pawar: प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
Ashok Kharat Crime news: जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
Dhananjay Munde: 'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज; प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज; प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
NEET Exam Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'चा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिस गाजवलं, पण 100 कोटींपर्यंतची वाट अजूनही खडतर, आतापर्यंत किती कमाई?
'राजा शिवाजी'चा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिस गाजवलं, पण 100 कोटींपर्यंतची वाट अजूनही खडतर, आतापर्यंत किती कमाई?
Pune Crime Firing Lawrence bishnoi gang: पिंपरी-चिंचवडमधील एजे फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
Maharashtra Live blog updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा 
Maharashtra Live blog updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा 
Embed widget