Nashik Crime News:नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या येवला (Yeola) तालुक्यातील ममदापूर (Mamdapur) गावात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पाण्याची मोटर सुरू करण्याच्या किरकोळ कारणावरून सासऱ्याने आपल्या सुनेलाच काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nashik Crime News: वादातून हिंसा, सुनेवर काठीने हल्ला
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर येथील रहिवासी बबन किसन गुडघे यांचा पाण्याची मोटर सुरू करण्यावरून सून मनीषा दत्तू गुडघे हिच्याशी वाद झाला. पाहता पाहता हा वाद टोकाला गेला आणि बबन गुडघे यांनी काठीने मनीषा गुडघे हिला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट
या मारहाणीचा सगळा प्रकार मनीषा गुडघे यांच्या मुलाने मोबाईलमध्ये शूट केला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Nashik Crime News: सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची दखल घेत येवला तालुका पोलीस ठाण्यात बबन किसन गुडघे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.
Nashik Crime News: पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू
दरम्यान, पीडित मनीषा गुडघे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, येवला तालुका पोलीस या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. कौटुंबिक वादातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Jalgaon Crime News: जळगावात किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या
दरम्यान, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जुना मारुती मंदिर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. सागर अरुण बिऱ्हाडे याचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले असून ढकलल्याने डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरला डॉक्टरांनी मृत घोषित करतात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. तर दुसरीकडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेत तपास चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
