Nashik Crime news:नाशिकच्या मालेगावातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सोपान बोरसे यांचा मंगळवारी शाळेतील जिन्याच्या पायऱ्या घसरून पडले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. मयत प्राध्यापक सोपान बोरसे (Sopan Borse) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ' इन कॅमेरा ' करण्यात यावे अशी मागणी या शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्याकडे केली. पोलीस शिवसैनिकांची ही मागणी मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल. तसे झाल्यास सोपान बोरसे यांच्या शवविच्छेदन अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येणार का, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. मध्यंतरीच्या काळात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेत भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा भ्रष्टाचार (Corruption) लपवण्यासाठी संस्थाचालकांकडून शिक्षकांवर दबाव होता होता का ? असा संशय देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. या सगळ्यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्यावरही प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Crime news)

Continues below advertisement

सोपान बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रशासक अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या सगळ्यांवर मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत प्राध्यापकास वेळोवेळी चौकशीस बोलवणे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे व अपमानित करणे आदी कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी सायंकाळी हे प्रकरण घडल्यानंतर संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राध्यापकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शिक्षण विभागाचे अधिकारी व संबंधितांनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात केली होती. मयत प्राध्यापकाच्या भावाने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Continues below advertisement

इतर बातम्या

Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं

Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना