Nashik: नाशिकमधील निफाडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडल्याची तक्रार आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात पीडितेने सहा सात तरुणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर 5 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आडगाव पोलिसांनी  चार आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे.

Continues below advertisement

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी दोन जणांनी अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. यात पीडित तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली असून हा सामुहिक अत्याचार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पीडित तरुणी आणि संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार निफाड पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

वेगवेगळ्या ठिकाणी घडली घटना

काल निफाड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुणीने सहा सात तरुणांविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ही घटना वेगवेगळ्या ठिकाणीची असल्याने तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. निफाड पोलिस ठाण्यातून 5  जण ताब्यात घेण्यात आले आहे. हा सामुहिक अत्याचार नसून वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना असल्याचं समजतंय. याबाबत आता तक्रार कशी आली याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपी ताब्यात घेतलंय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी 2 जणांनी अत्याचार केल्याची  पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे बोललं जात असताना पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली आहे. यात कात्रज घाटामध्ये दोघांकडून फायरिंग करण्यात आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार दीपक लोकर या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉयवर ही फायरिंग करण्यात आली आहे. या गोळीबारच्या घटनेमध्ये दीपक लोकर हा जखमी झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास दीपक लोकर याला एका अज्ञाताने कात्रज घाटात नेत फायरींग केली आहे. यात दीपक यांच्या छातीमध्ये ही गोळी अडकली असून घटना स्थळावरती पिस्टल पोलिसांना मिळाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

Pune Crime: पुण्यातील कात्रज घाटात पुन्हा गोळीबाराचा थरार! हल्ल्यात वॉर्डबॉय जखमी, आरोपी फरार