Nashik Doctor Suicide: नाशिकमधल्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात एका डॉक्टर विवाहित महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना घडली. डॉक्टर मनीषा निलेश जेजुरकर (Nilesh Jejurkar) असे या मयत महिलेचे नाव असून डॉक्टर असलेल्या या महिलेने आत्महत्या केल्याने सर्वत्र नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर निलेश जेजुरकर  हे नाशिकच्या (Nashik News) जिल्हा रुग्णालयात कार्यरत असून या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होते आणि या वादातूनच डॉक्टर मनीषा (Manisha Jejurkar) यांनी आत्महत्या केल्याचे माहेरच्या नातेवाईकांनी निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. गंगापूर पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार असून गंगापूर पोलीस तसेच क्राइम ब्रांचकडून त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.(Maharashtra Crime news)

Continues below advertisement

मात्र, मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर मानसिक त्रासातून आणि घरात मिळणाऱ्या पतीच्या छळवणुकीतून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने ही घटना घडल्याचे सांगत या प्रकरणातील इतर आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर देखील कारवाई करत न्याय मिळावा, अशी मागणी मनीषा यांचे भाऊ हेमंत भास्कर यांनी केली. मनीषा यांचे पती निलेश जेजुरकर हे वारंवार मनीषा यांना त्रास देत होते, हे त्यांच्या कुटुंबाला देखील माहिती होते. मात्र, आम्ही अनेकदा चर्चेसाठी त्यांना बोलावलं मात्र एक ना अनेक कारणांनी त्यांनी चर्चा होऊ दिली नाही. मनीषा यांना होणारा वारंवार मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी अखेर त्यांची जीवनयात्रा संपली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात ही आत्महत्या मनीषा यांनी का केली, याची अनेक कारणे आहेत या संदर्भात पोलिसांनी सखोल तपास करावा आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मनीषा यांच्या भावांकडून करण्यात आली. मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निलेश जेजुरकर यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बहिणीला दीड वर्षांपासून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Manisha Jejurkar News: पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ, डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट

Continues below advertisement

एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता. डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केला होता.

आणखी वाचा

पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?