Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री! स्वतः दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी करणार आरोपींची चौकशी
Nashik Crime News : नाशिकमधील नामांकित कंपनीत सुरु असलेल्या धर्मांतर प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक पोलीस बरोबरच दहशतवाद विरोधी पथक ही या प्रकरणाचा तपास करणार (ATS) आहे.

Nashik Crime News : भोंदू अशोक खरात प्रकरण असेल किंवा एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार असेल, या घटनेनं नाशिक (Nashik) शहराचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच नाशिकमधील नामांकित कंपनीत सुरु असलेल्या धर्मांतर प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक पोलीस बरोबरच दहशतवाद विरोधी पथक ही या प्रकरणाचा तपास करणार (ATS) आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News ATS : स्वतः एटीएस आरोपींची चौकशी करणार
दरम्यान, नाशिक शहरात एटीएसचे (ATS) पथक दाखल असून एक अधिकारी आणि तीन कर्मचारी यांनी तपास सुरू केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेत आता एटीएसची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे. नाशिक शहर पोलिसांकडून याबाबतची माहिती घेत तक्रारदारांकडून माहिती घेतली जाणार असल्याची माहिती आहे. स्वतः एटीएस आरोपींची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तपासासाठी सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्रे देखील तपासणार आहे.
Nashik Crime News: राष्ट्रीय महिला आयोगाचा नाशिक दौरा
या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची (NCW) टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. ही टीम पीडित महिलांशी संवाद साधून प्रकरणाची सविस्तर पाहणी करणार आहे.
Nashik Crime News: प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या वीस दिवसांपासून फरारच
नाशिकच्या नामांकित कंपनी मधील महिला अत्याचार, छळवणूक आणि धर्मांतर प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. गेला वीस दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे मात्र अद्यापही तिचा ठाऊक ठिकाणा लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सहा पुरुष आरोपी तर दोन महिला आरोपी असल्याने हे प्रकरण दररोज एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले जात होते हा धक्कादायक उलगडा झाल्याने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















