एक्स्प्लोर

Nashik Crime News: ज्योतिषाकडूनच 72 लाखांचा चुना; शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं, नाशिकमधील घटना

Nashik Crime News: शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका ज्योतिषाने गुंतवणूकदारांना तब्बल 72 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News: शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील (Nashik) एका ज्योतिषाने गुंतवणूकदाराला तब्बल 72 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरणपूर रोड परिसरात ‘अंजनिय ज्योतिष केंद्र’ चालवणाऱ्या सचिन देशमुख याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नाशिक सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन देशमुख याने स्वतःला अनुभवी ज्योतिष आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून सादर केले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला ऑनलाइन मीटिंग्स, झूम कॉल्स तसेच कार्यालयात प्रत्यक्ष भेटी घेतल्या. “शेअर मार्केटमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केल्यास मोठा नफा निश्चित मिळतो,” असे सांगत त्याने गुंतवणूकदारांना आकर्षित केले.

Nashik Crime News: सुरुवातीच्या काही गुंतवणुकीवर नाममात्र परतावा

विश्वास अधिक दृढ करण्यासाठी त्याने सुरुवातीच्या काही गुंतवणुकीवर नाममात्र परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर परतावा देणे अचानक थांबवण्यात आले. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ, विविध कारणे आणि खोटी आश्वासने देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Nashik Crime News: 72 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात एकूण 72 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम कुठे व कशी वळवली, इतर बळी आहेत का? याचा तपास सुरू आहे.

Nashik Crime News: प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत भरघोस परताव्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे. अधिकृत नोंदणी, परवाने आणि व्यवहारांची खातरजमा केल्याशिवाय गुंतवणूक करू नये. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik MNS: 'फिजिक्सवाला'मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, साताऱ्यात नातेवाईकांची मागणी
माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, साताऱ्यात नातेवाईकांची मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget