Nashik Crime News Ashok Kharat : नाशिकमध्ये स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणारा अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन याच्या पाशवी कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) यानं एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचंप्रकरणसमोरआलंआहे. याप्रकरणी अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर (Nashik Crime News) गुन्ह्यात अटक करण्यातआली आहे. एका महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्याचा भोंदूगिरीचा आणि अत्याचारांचा कथित प्रकार अखेर उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी (दि. 18) त्याला अटक केली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमधील माहितीमुळे तपास अधिकच गंभीर व धक्कादायक वळणावर पोहोचला आहे. सोबतचत्याचेअनेककारनामेआतापोलीसतपासातपुढेयेतआहे. असेअसताना अशोक खरातचे कुटूंबीय गोंधळ घालून तपासात अडथळा आणत आहेत. कर्तव्यबजावतातअसतानाआणि रिपोर्टींग करायला आलेल्या पत्रकारांवर खरातच्याकुटुंबीयांनीचक्क चपला फेकत, अंगावर कुत्रा सोडल्याचासंतापजनक प्रकर करण्यातआलाआहे.
Nashik Crime News : बंगल्याबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारवर दादागिरी करत धमकी
नाशिकमध्ये कॅप्टन खरात यांच्या घरातील काही व्यक्तींनी दादागिरी केल्याची घटना समोर आली आहे. बंगल्याबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारवर दादागिरी करत धमकी देण्यातआलीआहे. सोबतचपत्रकारांसोबत गैरवर्तन करत कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यातआलाआहे. दरम्यान अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात दरम्यान, खरातने मागील 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया जमवली.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातविरोधात याआधीही तक्रारी
खरातचे राज्यात आणि परराज्यात मोठे जाळे असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी आणि उच्चशिक्षित महिलाही जात असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या दाव्यानुसार, काही उद्योजिका, व्यावसायिका, राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी वर्गातील महिलाही त्याच्या अत्याचारांच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत अशोक खरात विरोधात तक्रारी झाल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नव्हती.
आणखी वाचा
