Nashik Crime News नाशिक : शाळेत सोबत शिकत असल्याच्या ओळखीवरून एका मित्राने आपल्या इंजिनिअर (Engineer) मैत्रिणीला बदनामी करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी केली. मैत्रिणीकडून त्याने तब्बल 40 लाखांची खंडणी (Extortion) उकळल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी उकळणारा युवक मात्र फरार झाला आहे. अभिजित नरेंद्र आहिरे (31, रा. गोविंदनगर, मुंबई नाका) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती व संशयित अभिजित आहिरे (Abhijit Ahire) हे गोविंदनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. शिक्षण सुरू असतानाच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडित युवती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत नोकरीला लागली आहे. तर संशयित अभिजित हा बेरोजगार आहे. मात्र दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
युवतीकडून वारंवार पैशांची मागणी
संशयित अभिजित याने पीडित युवती नोकरीला (Job) असल्याने याच संधीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेकडे गरिबी व अन्य कारणाने पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयित युवतीकडून वारंवार पैशांची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर पीडितेशी असलेल्या प्रेमसंबंधातून काढलेले फोटो मॉर्फ करून ते नातलगांमध्ये व्हायरल करण्याचे धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करू लागला.
आतापर्यंत 40 लाखांची उकळली खंडणी
समाजात बदनामीच्या भितीने युवतीने संशयिताला पैसे दिले. पीडितेने अनेकदा कर्ज काढून संशयिताला कधी रोख स्वरुपात तर कधी ऑनलाईन स्वरूपात पैसे दिले. संशयिताने आतापर्यंत तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी युवतीकडून उकळली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात (Mumbai Naka Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी पोलीस निरीक्षक पंकज सोनवणे यांना तपासाचे निर्देश दिले आहेत.
संशयित आखाती देशात असल्याची शक्यता
संशयित अभिजित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो आखाती देशामध्ये असल्याची शक्यता पीडितेने वर्तविली आहे. संशयित अभिजितचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पंकज सोनवणे हे करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime News : सोन्याचे मणी असल्याचे सांगत लोकांना गंडा; राजस्थानमधील तिघांना नाशिकमध्ये बेड्या