Nanded : नांदेडमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा घडला आहे. कुटुंबाची कार फोडत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना राष्ट्रवाी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली. संबधित कुटुंब हे हैदराबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळील विष्णुपुरी भागात चार प्लॉट आहेत. 2009 साली त्यांनी हे प्लॉट खरेदी केले होते. त्या प्लॉटची रजिस्ट्री करुन देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना आयटीआय जवळ त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करवून घेतली जात होती. मात्र दरम्यान कुटुंबाने हैद्राबाद मधील राजकीय व्यक्तीशी संपर्क केला. त्या राजकीय व्यक्तीने इकडे माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांना प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली. त्यानंतर पोकर्णा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले.
महत्वाच्या बातम्या:
Nanded News : कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं