Nanded crime: राज्यभरात गुन्हेगारीने कळस गाठला असून नांदेडमधून भयंकर घटना समोर आली आहे . 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय उपसरपंचाने गुंगीच्या गोळ्या खायला घालत वारंवार लैंगिक अत्याचार केला . यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली . तिने महिनाभरापूर्वी मुलीला जन्म दिला. आता हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी नराधमाने जन्मलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे.. (Nanded) नांदेडमधील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे .
आता या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .आरोपी उपसरपंच बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आली आहे .घटनेचा पुढील तपास नांदेड पोलीस करत आहेत . या प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. आरोपी उपसरपंचाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी होत आहे. (Nanded Crime News)
उपसरपंचाचं विकृत कृत्य,नांदेड हादरले
नांदेडमधील एक 16 वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत गावातीलच उपसरपंचाने अनैतिक संबंध ठेवले .अनैतिक संबंधांमधून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली .मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रस्तुती झाली .तिने एका मुलीला जन्म दिला . मात्र आता गावात बभ्रा होईल या भीतीने नवजात बाळाला विकल्याची चर्चा आहे .तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे .आरोपी हा गावातील उपसरपंच असून वर्षभरापूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालत त्याने लैंगिक अत्याचार केला .मुलगी गर्भवती राहिली आणि महिनाभरापूर्वी तिची प्रसूती करण्यात आली .आता हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी आरोपी उपसरपंच बाबुराव तुपे कर यांनी पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे .या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे .आरोपी उपसरपंच बाबुराव तुपेकर याला नांदेड पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे .या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असून आता पीडित मुलीच्या बाळाला विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.