Nalasopara Crime News: नालासोपाऱ्यात पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची (Nalasopara Crime News) धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव विजय चौहान असून, आरोपी पत्नीचे नाव गुडिया चमन चौहान आणि तिच्या प्रियकराचे नाव मोनू विश्वकर्मा आहे. या दाम्पत्याला चेतन चौहान नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा गुडिया आणि मोनू यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून विजयची निर्घृण हत्या केली. ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून, मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर टाईल्स (Drishyam-Style Murder In Maharashtra) बसवण्यात आल्या. विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच टाईल्स लावून घेतल्या गेल्याचे समोर आले आहे.
मृत विजयचा भाऊ घरी पोहचला तेव्हा...
विजय चौहानचा भाऊ त्याच परिसरात काही अंतरावर राहतो. तो शेवटचा 10 जुलै रोजी विजय चौहानच्या घरी आला होता. त्यानंतर पत्नी चमन देवी यांनी त्याला सांगितले की विजय कुर्ला येथे काही कामावर आहे आणि सध्या तिथेच आहे. यादरम्यान त्याचा फोन बंद येत होता. गेल्या शनिवारी (18 जुलै) विजय चौहानचा भाऊ पुन्हा त्याच्या घरी आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले की चमन देवी बराच वेळ घरी आली नव्हती. घराला कुलूप होते. त्यानंतर संशय वाढताच त्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता विजयचा मृतदेह घरातच जमिनीखाली गाडलेला आढळला.
आरोपी महिलेला अटक, प्रियकर मोनू फरार-
दोन दिवसांपूर्वी गुडियाच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मेसेज आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून या खूनाचा भयंकर उलगडा झाला. सध्या आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून, तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा फरार आहे. पोलिसांनी मृतदेह घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे नालासोपाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.