नागपूर: सध्या रिल्स बनवण्यासाठी किंवा आपल्यातील कला दाखवण्यासाठी अनेकदा काहीजण जीवघेणा स्टंट करतात. मात्र, रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असतानही असे स्टंट केले जातात. या स्टंटमुळे इतर प्रवाशांना, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, अनेकदा अपघाताचीही शक्यता असते. नागपूरमधील (Nagpur) वाठोडा पोलिस (Police) स्टेशन परिसरात गस्त घालत असताना, गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने एका तरुणाचा पाठलाग करून त्याला अटक केली. तरुण रस्त्यावर धोकादायक स्टंट करत होता आणि बेदरकारपणे मोटारसायकल चालवत होता. त्यामुळे, ही कारवाई करण्यात आली. 

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलिस स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावर हा तरुण वेगाने मोटारसायकल चालवत स्टंट करत होता, ज्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाने तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. अटक केलेल्या तरुणाचे नाव सूरज सिंग विक्रम सिंग (20 वर्षे) असे आहे. तो जरीपटका येथील लाल गोदाम येथील रहिवासी आहे. स्वामीनारायण मंदिर परिसरात नाकाबंदी दरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन पारडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले, जिथे त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

पोलिसांकडून आवाहन

पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आणि रस्त्यावर स्टंट करून किंवा बेपर्वाईने गाडी चालवून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहनही केले आहे. तसेच, अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.

Continues below advertisement

हेही वाचा 

चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना