Nagpur News : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र असे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या (Nylon Manja)वापर नागरिकांच्या जिवावर उठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. असेअसताना संक्रांत संपल्यानंतरही उपराजधानी नागपुरात नायलॉन मांज्याची दहशत कायम असलयाचेचित्रआहे.नागपुरात पुन्हा एकाच गळा कापला गेल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. नागपुरात अग्निशमन विभागाच्या एका जवानाचा गळा कापला गेल्याची घटना घडलीय.
Nagpur News Nylon Manja Accident: ड्युटी संपवून दुचाकीने घरी जात असताना अपघात, गळा खोलवर कापला
मिळालेल्यामाहितीनुसार, जखमी जवानाचे नाव गोविंदा बावणे असूनते लकडगंज फायर स्टेशनमध्ये प्रमुख अग्निशामक विमोचक म्हणून कार्यरत आहे. ड्युटी संपवून दुचाकीने घरी जात असताना हि घटना घडलीय. तर सायंकाळच्या सुमारास कमाल चौक परिसरात हा अपघात झाल्याचीमाहितीआहे. कापलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा अचानक गळ्यात अडकला परिणामी, वाहनावर नियंत्रण मिळवण्यात बावणे यश आलं, मात्र नायलॉन मांज्यामुळे त्यांच्या गळा खोलवर कापला गेलाय.
Nylon Manja Accident: गळ्याची जखम गंभीर, प्रकृती सध्या चिंताजनक
दरम्यान, याघटनेत त्यांच्यागळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते रक्तबंबाळ झालेत. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनतरत्यांना गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र गळ्याची जखम गंभीर असल्याने त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. मात्र, एकीकडे नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने चिंता व्यक्तकेलीजातआहे.
Nylon Manja : नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा
जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पोलीस विभागाने तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर विक्री आणि वापराबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. सोबतच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील पोलीस म्हणाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
