Nagpur News नागपूर :  उपराजधानी नागपूरच्या (Nagpur News) गुन्हेगारी विश्वातून एक बातमी समोर आली आहे. यात एका कुख्यात फरार एमडी तस्कराला जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना(Nagpur Police) यश आले आहे.  नागपूर पोलिसांच्या एनडीपीएसच्या (NDPS) पथकाने ही कारवाई करत त्याला अटक केली आहे. शेख अतिक शेख लतिफ असं या अटक केलेल्या एमडी तस्कराचे (Nagpur Crime) नाव असून तो नागपूरचा कुख्यात अमली पदार्थ तस्कर आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल आणि 13 जिवंत काडतूस देखील जप्त केले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 


दोन गावठी पिस्तूलसह 13 जिवंत काडतूसही जप्त


 शेख अतिक शेख लतिफ हा एक कुख्यात अमली पदार्थ व एमडी तस्कर आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार असून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर या फरार संशयित आरोपीला नागपूर पोलिसांच्या एनडीपीएसच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल आणि 13 जिवंत काडतूस जप्त केले आहे. तो वाठोडा भागात एका घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत त्याला अटक केली आहे. तो नागपूरच्या पाचपवली पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रग जप्ती प्रकरणात फरार होता. त्याला क्राईमब्राँच पथकाकडून अटक करण्यात आली आहे.


लाखों रुपयांची हातभट्टीची दारू जप्त


अमरावती शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटने वडाळी आणि भारत नगर येथे संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. यात 26 ड्रम मोहा सडवा तसेच 277 लिटर गावठी हातभटटीची दारू आणि इतर साहित्य असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भारत नगर, वडाळी परिसरात बादशहासिग टांक हा सार्वजनिक ठिकाणी तर परिहारपुरा परिसरातील एक महिला स्वतःच्या घरी हातभटटी लाऊन दारु गाळतांना मिळून आली. दोघांकडून 26 ड्रम मोहाचा सडवा जप्त करण्यात आलाय. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू जप्त केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या