Nagpur HSC 12th Exam : नागपूर शहरात बारावी (HSC) परीक्षेतील पेपर फुटल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बारावीच्या दोन पेपरफुटी प्रकरणाच्या (Nagpur HSC 12th Exam) तपासाअंतीआता दोघांना अटक करण्यातआलीआहे. कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला याप्रकरणीपोलिसांनी बेड्या ठोकल्याआहेत. राज्याला हादरविणाऱ्या यापेपरफुटीच्या प्रकरणात नागपुरातून मोठी कारवाई करण्यातआलीअसून सदर पोलिसांकडून अद्यापयाप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Continues below advertisement

12th Exam Papers Leaked: कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्यामाहितीनुसार, निशिकांत मूल (४५, मानकापूर) असं ट्युशन क्लासेस चालवणाऱ्या संचालकाचे नाव आहे. तर फरहान अख्तर असं अटककरण्यातआलेल्या विद्यार्थ्यांच नाव आहे. सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकामुळे हा प्रकार उघड झालाहोता. यात रसायनशास्त्राच्या पेपरच्या वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका आल्याचेपुढंआलंहोतं. दरम्यान, वारंवार प्रसाधनगृहात गेलेल्या विद्यार्थिनीवर संशय आल्यानेतिची झडती घेतलीअसता स्मार्टफोन आढळूनआला. त्यानंतरहामोबाईल जप्त करततपासणीकेलीअसता मोबाईलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 10.37 ला पेपर, प्रश्नांसोबत उत्तरेही एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आढळूनआले. ‘XII’ नावाच्या 21 सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर निशिकांत मूलच्या क्रमांकावरून पेपर पाठवल्याचे उघड झालं. यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता. नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकरण उघडकीस आला आहे.

Continues below advertisement

Nagpur Police : आणखी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पेपर? मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

दरम्म्यान प्रकरण उघड होताच तो क्रमांक निशिकांत मूल याने बंद केला. 16 फेब्रुवारीचा फिजिक्स पेपरही मोबाईलमध्ये सापडला होता. या दोन्ही विषयांची पेपरफुटीची पुष्टी पोलिसांकडूनकरण्यातआलीअसून कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला याप्रकरणीपोलिसांनी बेड्या ठोकल्याआहेत. फरहानने ग्रुपवर उत्तरं टाकल्याचा आरोप आहे. तरयाप्रकरणी दोघांना न्यायालयाकडून चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यातआलीआहे. अशातचहि प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आली? यातआणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास पोलिसांकडूनसुरुकरण्यातआलाआहे.

 इतर महत्वाच्या बातम्या