Nagpur Crime News : नागपूर शहरातूनएकखळबळजनकप्रकारसमोरआलाआहे. एका महिलेचा मृतदेह (Nagpur Crime News) कन्हान नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरातएकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव अश्विनी उर्फ आशी डे असे असल्याचीमाहितीआहे. दरम्यान, तिचा मृत्यू आत्महत्येमुळे(Crime News) झाला की घातपात झाला, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. मात्रयाघटनेनेपरिसरातआता विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, मृत महिलेचा कन्हान येथील एका पुरुष वाद सुरू होता. या संदर्भात तिने यापूर्वी पोलिसांत (Nagpur Police) तक्रारही केली होती. तसेच, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये खबऱ्या म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आशीचा मृत्यू अपघाती, आत्महत्या की अन्य कोणत्या कारणामुळे झाला? याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही.
Nagpur Crime News : खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय; पोलिसांकडून सखोल तपासणी
दरम्यान, मृत महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, तिच्या संपर्कातील व्यक्ती तसेच इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचीमाहिती पोलीस उपनिरीक्षक रेश्मा सरगर यांनीबोलतानादिलीआहे.
Nagpur Crime: लग्नाचे आश्वासन देत महिलेसोबत शारीरिक संबंध; लग्नाबाबत विचारणा केली असता शिवीगाळ अन् मारहाण
नागपुरात फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर मैत्री, त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत एका महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आलाआहे. यातसंशयित आरोपीचे नाव अमितकुमार हूमने असून तो भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. संशयित आरोपी आणि फिर्यादी महिलेची फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अशातचतक्रारदार महिलेने संशयित आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, संशयित आरोपीने शिवीगाळ करत तिच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
