Nagpur Crime News : नागपुरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत सामूहिक बलात्काराची (Crime News) घटना घडली आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपीच्या घरात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला (Nagpur Crime News) अटक केली आहे. तर इतर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याघटनेनंशहरातएकचखळबळउडालीअसूनसध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे. मात्रयाघटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नपुन्हाचर्चेतआलाआहे.
Nagpur Crime News : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, अन्....
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अल्पवयीन मुलीची आरोपी सोबत ओळख होती. आरोपीने तिला 4 फेब्रुवारी रोजी भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले. मुलगी आरोपीच्या घरी त्याचे कुटुंबीय ही असतील या भावनेतून दुसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) भेटायला गेली असता, आरोपीने आधी स्वतः तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर सोबतच्या दोन्ही अल्पवयीन आरोपींनीही पीडित मुलीशी गैरकृत्य केले. सुरुवातीला घाबरलेल्या मुलीने याची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र नंतर कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे.
Gadchiroli News : आश्रम शाळेतील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग करून मारहाण, दोन्ही शिक्षक निलंबित
गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील लोहारा आश्रम शाळेतील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने चौकशी करून दोन्ही शिक्षकांना निलंबित केले. तर याप्रकरणी दोन्ही शिक्षकांवर मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली आहे. सुभाष लांडे आणि संदीप फड असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी दोन मुलींनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थिनींना परीक्षेची उत्तरे बघून लिहिल्याचा आरोप करत त्यांना बेदम मारहाण केली तर धमकी देत दोघांनीही विनयभंग केल्याचे म्हटले आहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
