Nagpur Crime News: नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहे.धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या त्याच टोळीने महिलांची सोनसाखळी हिसकावली असून एका ठिकाणी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. भर रस्त्यात ज्येष्ठ महिलांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, यातील पहिली घटना सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद चौक येथे सकाळी नऊ वाजता घडली. यात 60 वर्षीय महिला भाजी बाजारातून भाजी घेऊन पायी घराकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची गळ्यातली 1 तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तर दुसरी घटना साडेअकरा वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थ नगर भागात घडली. या घटनेत 62 वर्षीय महिलेच्या गळ्यातली सव्वा तोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यानी बळजबरीने हिसकावून नेली. असे असूनही चोरट्यांचा अद्याप कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. दरम्यान या दोन्ही घटनेने सर्वत्र दहशत पसरली असून या चोरट्यांना शोधून काढणं आता पोलिसांपुढचे आव्हान असणार आहे.

अल्पवयीन विद्यार्थ्याची क्रूर हत्या; मित्रानेच केला खून

कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मदरशात शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फैजान नाजिम (रा. बिहार) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, हा खून त्याच्याच अल्पवयीन मित्राने केल्याचा कबुली दिली आहे. आरोपीने शाळेला सुट्टी मिळावी म्हणून ही कृती केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयिताने फैजानच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि विजेचा शॉक देऊन त्याचा खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तब्बल 42 दुचाकी जप्त 

गडचिरोली : गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिसांनी दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून 16 लाख 500 रुपये किमतीच्या तब्बल 42 दुचाकी जप्त केल्या असून बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या वाहनांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या टोळीकडून समोर आला आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील कारागृहात असलेल्या विनयप्रकाश धरमु याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असता या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे, संजय मुन्ना लकडा, राजेंद्र चूंदा लकडा, राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केली असून सर्व 7 आरोपींना 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये काही गडचिरोली तर काही छत्तीसगडमधील आरोपी आहेत.

हे ही वाचा