Nagpur News: चोरी करून पळून जाण्यासाठी चोर कमालीचा चपळ असणं आवश्यक असतं. मात्र निमुळत्या जागेतून आत जाऊन यशस्वीपणे चोरी करण्यासाठी चोराचं शरीर लवचिक असणं ही तेवढाच आवश्यक असतं. नागपुरात एका चोराने (Nagpur Crime News) अशीच अफलातून लवचिकता दाखवत बियर शॉपीमध्ये चोरी केलीय. त्याची ही लवचिकता सीसीटीव्हीमध्ये चित्रितही झाली आहे. नागपूरच्या या लवचिक आणि अफलातून चोरीची सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे. 

नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत रमाश्री बियर बारमध्ये सहा जूनच्या मध्यरात्री चोरीची (Crime News) घटना घडली होती. मात्र बिअर शॉपीमध्ये काउंटरवरील लोखंडी जाळीच्या आत ठेवलेली 25 हजारांची रोख रक्कम चोरट्याने कशी चोरली? असा प्रश्न पोलिसांसमोर होता. 

काउंटरच्या आत ठेवलेली 25 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास

दरम्यान, जेव्हा पोलिसांनी या बियर शॉपीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा वीस वर्षांचा शेख राजा शेख बाबा हा चोर कमालीची लवचिकता दाखवत काउंटर वरील लोखंडी जाळी मधून पैसे घेऊन बियरची बॉटल ग्राहकांना देण्यासाठीच्या निमुळत्या जागेतून आत शिरताना दिसून आला. शेख राजा शेख बाबाने या निमुळत्या जागेतून आत प्रवेश करून काउंटरच्या आत ठेवलेली 25 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. मात्र तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा त्याने या चोरीची कबुली तर दिलीच. सोबतच अमरावती मधूनही काही दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाले आहे.

नशेच्या अवस्थेत हत्या; अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अकोला: शनिवारच्या मध्यरात्री अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. यवतमाळचे रहिवासी गंगाधर डाबेराव यांच्यावर रात्री सुमारे १२ वाजता अज्ञात व्यक्तीने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली.

या घटनेची माहिती पोलीसांना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिस तपासादरम्यान एलसीबीने एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हत्या नशेच्या अवस्थेत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या