Nagpur Crime News :  नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत आरोपीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पोस्कोचा आरोपी नरेंद्र भाटिया याने पोलीस कोठडीत अंथण्यासाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या (Nagpur Crime) केली होती. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्यूटीवर हजर असतांन ही घटना घडली होती. त्यानुसार रात्रपाळी ड्युटी अधिकारी आणि कर्मचारी पोलीसउपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी) आणि अभय खडसे (ठाणा हजेरी गार्ड इन्चार्ज तसेच लॉकअप गार्ड इन्चार्ज), प्रमोद दूधकवरे (लॉकअप गार्ड ड्युटी), राहुल चव्हाण (लॉकअप गार्ड ड्युटी) यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Nagpur Crime News : पोस्कोच्या गुन्ह्यात दोन दिवसांपूर्वी अटक, कोठडीतच टोकाचं पाऊल

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपीने गळफासघेत आत्महत्या केलीहोती. त्याने रात्री गळफास लावून हि आत्महत्या केलीहोती. रात्रीझोपायला पांघरण्यासाठी दिलेली चादर फाडून गळफास तयार करून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासापुढेआलीआहे. नरेंद्र भाटिया असं आरोपीचे नाव असूनत्याला पोस्कोच्या गुन्ह्यात (POCSO accused) दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.

Continues below advertisement

Nagpur Police : चौकशीअंती पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 

घटनेनंतर पहाटे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देत माहिती घेतली. तरदुसरीकडे आरोपीच्याकुटुंबीयांनीहीयावरआक्षेपघेतकारवाईचीमागणीकेलीहोती. दरम्यानपोलिसांनीकेलेल्याचौकशीतआताएक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Nagpur Crime News : नागपूर जिल्हा तीन वेगवेगळ्या हत्यासत्राने हादरला

नागपूर जिल्हा तीन वेगवेगळ्या हत्यासत्राने हादरलेआहे. शहराच्या हद्दीत अजनी व गिट्टीखदान भागात दोन हत्येच्या घटना घडल्या तर नागपूर ग्रामीणच्या हद्दीत फेटरी येथे एका तरुणीची प्रियकराकडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यन, पहिली घटना कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्येझालीआहे. यात प्रियकरांकडून रुचिता भांगे मृतक तरुणीची प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडालीआहे. ओयो हॉटेलमधे दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारुन पळ काढला.

दरम्यान, दुसरी घटना अजनी भागात घडली. अकराशे रुपये उधारीसाठी योगेश काकडे या तरुणाची अल्पवयीन आरोपीकडून हत्या करण्यात आली. तर तिसरी घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगार नगरमध्ये घडली. जुन्या वादातून बजरंग दलाच्या माजी शाखा प्रमुख हर्ष पांडेची आरोपीकडून धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. तीन हत्याकांडाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले आहे.

आणखी वाचा