Nagpur Crime News : अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
Nagpur Crime News : नागपूर शहर पुन्हा एकदा एका हत्येच्या घाटानेनं हादरलं आहे. शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जादुमहाल परिसरात 200 रुप्याच्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.

Nagpur Crime News : नागपूर शहर पुन्हा एकदा एका हत्येच्या घाटानेनं हादरलं आहे. शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जादुमहाल परिसरात 200 रुप्याच्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या (Nagpur Crime News) करण्यात आलीय. सागर सलामे असं या तरुणाचे नाव आहे. धक्कदायक बाब म्हणजे हत्येच्या आरोपात अटकेत (Crime News) असलेले सर्व अकरा आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) तपासत उघड केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना आरोपी आणि सागर सलामे यांच्यात जुना वाद उफाळून आला. दरम्यान हाणामारीचे रूपांतरण रक्तरंजित राड्यात झाले आहे. या घटनेनं परिसरात मोठी दहशत पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Nagpur Crime News : गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना काही तासात अटक, सर्व आरोपी हे अल्पवयीन
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाआधी आरोपींचा मृतकासोबत पैशावरून वाद झाला होता. मृतक अजनी हद्दीत फिरायला आल्याची माहिती आरोपींना मिळताच त्याचा पाठलाग करून आरोपीने धारधार शास्त्राने हल्ला करत सागर सलामेची हत्या केली. यावेळी मृतकाचा मित्र त्याच्या सोबत होता. त्यात तो देखील गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना काही तासात अटक केली असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
Nagpur Crime News : जुन्या वादातून सागर सलामेची हत्या
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाआधी आरोपींचा मृत सागर सलामे या तरुणासोबत वाद झाला होता. मृतक अजनी हद्दीत आल्याची माहिती मिळताच आरोपीने धारधार शास्त्राने हल्ला करत सागर सलामेची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना काही तासात अटक केली आहे.
Crime: भंडाऱ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अड्याळ पोलिसांनी केली आरोपी तरुणाला अटक
नातेवाईकाच्या लग्नात ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली. भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध पॉक्सोसह विविध गुन्ह्यांची नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. आदित्य सोनटक्के असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी तरुणाचं नावं आहे. आरोपी आणि पीडिता हे एका नातेवाईकाच्या विवाहात फेब्रुवारी महिन्यात भेटले आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीच्या नावावर आरोपींनं पीडितेला रावणवाडी येथील एका हॉटेलवर नेतं तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेनं अड्याळ पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. पुढील तपास अड्याळ पोलिस करीत आहे.






















