एक्स्प्लोर

Nagpur Crime News : फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टी नागपूर पोलिसांनी उधळली; 4 महिलांसह चौघा 'झिंगाट' मित्रांना अटक

Nagpur Crime News : नागपूर शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकत ही रेव्ह पार्टी उधळून लावली आहे.  

Nagpur Crime News : नागपूर शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकत ही रेव्ह पार्टी उधळून लावली आहे.  नागपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये (Crime News) 4 महीला आणि 4 पुरुष सहभागी असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना (Nagpur Police) या ठिकाणी काही प्रमाणात एम.डी हे अमली पदार्थ ही या ठिकाणी आढळून आले आहे.  हे अमली पदार्थ पोलिसांनी त्या ठिकाणातून जप्त करत पुढील चौकशी सुरू केली आहे. यावेळी 2 चारचाकी वाहनांसह 6 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण 26 लाखांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहे.  

एकुण 26 लाखांचा मुद्देमालसह 4 महिला अन् चौघा 'झिंगाट' मित्रांना अटक

पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-जबलपूर मार्गावरील "एस फॉर्म" या खाजगी फार्म हाऊसमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर ही एक पार्टी सुरू होती. त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलि‍सांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने सामाजिक सुरक्षा पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळेस त्या ठिकाणी असलेल्या चार महिला आणि चार षुरुष अशा आठ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र यावेळी एम.डी हे अमली पदार्थ आढळून आल्याने ते नेमकं कुणी आणि कोणी पुरवलं याचा शोधही पोलीस आता घेत आहे. 

दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये सुनील शंकरलाल अग्रवाल (वय 61, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (वय 51, रा. रामदासपेठ), नीलेश बाबुलाल गडिया (वय 61, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) आणि मितेश मोहनलाल खक्कर (वय 48, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

यवतमाळ जवळील नागपूर-तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.  प्रेम संतोष बावणे आणि रोहित आमटे असे मृतकाचे नाव आहे. दोघेजण वाघाडी करून यवतमाळकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. उडान पूलचे काम सुरू आहे. अशातच काम सुरू असताना डिव्हायडर रस्त्याच्या मधोमध आहे. ये-जा करणाऱ्या कोणत्याही प्रवाश्यांना डिव्हायडर दिसत नाही त्यामुळेच हे अपघात होत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Accident : इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, भिवंडीत फरीद बागमध्ये हृदयद्रावक दुर्घटना
इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, भिवंडीत फरीद बागमध्ये हृदयद्रावक दुर्घटना
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
IVF Scam :  आयव्हीएफ सेंटरवर मूल बदललं, DNA टेस्टमधूनही सिद्ध; आपलं अपत्य परत आणण्यासाठी माता-पित्यांची आगतिकता
IVF सेंटरवर मूल बदललं, DNA टेस्टमधूनही सिद्ध; आपलं अपत्य परत आणण्यासाठी माता-पित्यांची आगतिकता

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Embed widget