Nagpur Crime News : नागपूरशहरपुन्हाएकदाहत्येच्याघटनेनंहादरलंआहे. यात दारूच्या नशेत शेजाऱ्याने माय-लेकीची निर्घृण हत्या केल्याचीघटनाघडलीय.नागपूर जिल्ह्यातील उमरेड ​गांगापुर कालवा परिसरातील हीथरारक (Nagpur Crime News) घटनाघडलीआहे. शेजाऱ्याच्या किरकोळ भांडणात निलेश ठाकरेने लाकडी दांडक्याने मायलेकीवर हल्ला केला, त्यात पर्वता फुकट व संगीता रिठे यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्यासुमारासहिघटनाघडल्याची (Crime News) माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीआहे.

मिळलेल्यामाहितीनुसार, व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका नशेखोर तरूणाने आपल्या शेजारी राहणाऱ्या माय-लेकीची किरकोळ वादातून निर्घृण हत्या केली. हि थरारक घटना शनिवारला (दि.27) दुपारच्या सुमारास उमरेड शहरातील गांगापुर कालवा परिसरातील झोपडपट्टीत घडली. भरदिवसा घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे उमरेड हादरले आहे.

Nagpur Crime News : किरकोळवादविकोपाला, नशेखोर तरूणाने माय-लेकीलानिर्घृणपणेसंपवलं

पार्वता शंकर फुकट (65) आणि त्यांची मुलगी संगीता वसंता रिठे (40) दोन्ही रा. गांगापूर, उमरेड अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. तर नीतेश किसन ठाकरे (31) रा. गांगापूर, उमरेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीतेश ठाकरे हा पार्वता फुकट यांच्या घराशेजारी राहतो. त्याला दारूचे व्यसन असून नशेत नेहमी वाद घालतो. शनिवारला (दि.27) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास नीतेश आणि पार्वता यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Nagpur Crime : रागाच्या भरात लाकडी दांडा उचलला अन् मायलेकीच्या डोक्यावर जोरदार प्रहार

दरम्यान, यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेल्या नीतेशने रागाच्या भरात जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वता व मुलगी संगीता यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यात आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेत ताब्यात घेत, शवविच्छेदनाकरीता रवाना केले. याप्रकरणी आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदवित, आरोपी नितेशला अटक केली.

ही बातमी वाचा: