Nagpur Crime Looteri Dulhan: नागपूरशहरातूनएकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' (Looteri Dulhan) ला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील एका तरुणाला लग्नासाठी नागपुरात बोलावून त्याच्याकडून 70 हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने उकळल्याची तक्रार पोलिसांना (Looteri Dulhan Gang) मिळाल्यानंतर तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यानयातील मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरसध्यापोलीस (Nagpur Police) याप्रकरणाचाअधिकतपासकरतअसून इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे. (Nagpur Crime Looteri Dulhan Gang)
Nagpur Crime News : लग्न खर्चाच्या नावाखाली 70 हजार रुपये आणि दागिनेउकळले
मिळालेल्यामाहितीनुसार, मूळचा गुजरातचा तक्रारदारअसलेल्या आकाश जिंदल पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात असताना त्याचा राणी पांडे हिच्याशी संपर्क झाला. 35 वर्षीय आकाश गुजरातच्या भावनगर येथील कुरिअर व्यावसायिक असूनत्याला लग्न करायची इच्छा होती. त्यामुळेहिसंधीहेरून नागपूरमध्ये एक मुलगी आहे, असे एका व्यक्तीने सांगितले म्हणून ते एका परिचितासह या वर्षी मार्च महिन्यात नागपूरला आला होता. यावेळी राणी पांडेने स्वतःला नम्रता मालवीयची बहीण सांगून लग्नासाठी तिच्या कथित बहिणीचे फोटो दाखवले. त्यानंतर आकाशला कोराडी येथील एका घरात नेऊन नम्रताशी भेट घडवण्यात आली. लग्न खर्चाच्या नावाखाली 70 हजार रुपये आणि दागिने घेतले.
Looteri Dulhan Gang : लग्नाची तयारी सुरू असताना नवरा आला अन्...
मात्र सीताबर्डीतील मंदिरात लग्नाची तयारी सुरू असताना एका व्यक्तीने नम्रता ही स्वतःची पत्नी असल्याचा दावा करत गोंधळ घातला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आकाशने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हेसर्वप्रकरणउजेडातआलेआहे. तर राणी पांडेचा यापूर्वीही अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
