एक्स्प्लोर

Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना

Nagpur Crime News: नागपूर आणि अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणात नवविवाहिता फाझिला जबीन शेख हिच्या मृत्यूमुळे हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Nagpur Crime News: नागपूर आणि अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणात नवविवाहिता फाझिला जबीन शेख (19 वर्षे) हिच्या मृत्यूमुळे हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टम केल्यानंतर मृत्यूचे गूढ उलघडले आहे. सासरच्यांनी 'हार्ट अटॅक'चा बनाव केला होता, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. (Nagpur Crime News)

अमरावती येथील रहिवासी फाझिला जबीन शेख हिचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरियापुरा परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांनी हुंड्याच्या मागणीवरून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. (Nagpur Crime News)

फाझिला आईला फोन करून रडत रडत काय म्हणाली? (Nagpur Crime News)

परिवाराच्या माहितीनुसार, 14 मे रोजी फाझिलाने आईला फोन करून रडत रडत “मला वाचवा… माझ्यासोबत काहीही होऊ शकतं…” असं सांगितले होते. यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून फाझिलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती देण्यात आली. मृत महिलेचे आई-वडील नागपुरात पोहोचल्यानंतर सुरुवातीला त्यांना मृतदेह देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर मृतदेह अमरावती येथे नेण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान घालत असताना फाझिलाच्या गळ्यावर जखमेचे निशाण दिसून आले. त्यामुळे हत्या झाल्याचा संशय अधिक गडद झाला.

मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन- (Nagpur Crime News)

मृत महिलेचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याआधारवर नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 238, 351(2) आणि 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी पती आणि दीराला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असून वृद्धापकाळामुळे सासऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडलं
चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडलं
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं 
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं 
रक्तरंजित थरार... नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं, तिघांचाही मृत्यू
रक्तरंजित थरार... नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं, तिघांचाही मृत्यू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget