Nagpur Crime News : लग्न झालेल्या एक्स गर्लफ्रेंडला पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपी विरोधात नागपुरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये (Nagpur Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सिंह पोर्ते असे 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी अनिलची पूर्वी घनिष्ठ मैत्री होती. मात्र अनिलच्या गैरवर्तनामुळे महिलेने त्याच्याशी संबंध तोडून दुसरीकडे लग्न केले होते. तेव्हापासूनच अनिल या महिलेला मानसिक त्रास देऊन जुने खाजगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत होता. आरोपीने महिलेचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून काही खाजगी फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. खाजगी फोटो सार्वजनिक न करण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ही पीडितेने पोलीस तक्रारीत केला आहे. (Nagpur Crime News)
दरम्यान, पीडितमहिलेनेदिलेल्यातक्रारीवरून खंडणी मागणाऱ्या आरोपी विरोधात नागपुरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचातपासकरतअसूनयाघटनेमुळेशहारतएकचखळबळउडालीआहे.
Nagpur Crime News : गोळीबाराच्या घटनेला आठ दिवस उलटले, तरी अद्यापही हल्लेखोरांचा शोधचलागेना
नागपूरचे प्रभाग 26चे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळीबार करणारे 2 संशयित हल्लेखोर अद्यापही पोलिसांना हाती लागलेले नाही. 25 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी मोटघरे यांच्या श्रावणनगर भागातील घराच्या दिशेने गोळी झाडली होती. त्यामध्ये घराच्या गॅलरीची काच फुटली होती. काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे तेव्हाच घरी पोहोचून पायातले जोडे काढत असताना ही घटना घडली होती. सुदैवाने मोटघरे स्वतः किंवा त्यांच्या घरातील कोणताही व्यक्ती त्यावेळेस गॅलरीमध्ये नसल्यामुळे जखमी झाले नव्हते.
दरम्यान, घटनेच्या दिवशी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. मात्र गोळीबाराच्या घटनेला आठ दिवस उलटले, तरी अद्यापही हल्लेखोरांना शोधण्यात नागपूर पोलीस अपयशी ठरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
