Nagpur Crime: घरात झोपलेल्या चिमुकलीचं अपहरण करून लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न, सुदैवाने आजीला जाग आली अन्...; नागपुरातील संतापजनक घटना
Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. यात घरात झोपलेल्या बालिकेचा अपहरण करून लैंगिक चाळे करण्याच्या एक नराधमाचा प्रयत्न फसलाय.

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. यात घरात झोपलेल्या बालिकेचा अपहरण करून लैंगिक चाळे करण्याच्या एक नराधमाचा प्रयत्न फसलाय. या अतिशय लाजिरवाण्या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या नराधमाला सीसीटीव्ही फुटेजवरुन केलेल्या तपासाच्या आधारे अटक केली आहे.
सुदैवाने आजीला जाग आली अन्...
पुढे आलेल्या माहितीनुसार, मानकापूर परिसरात 29 जूनच्या पहाटेच्या वेळेला एक घटना नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली. यात आरोपी श्रवण कुमार यादव याने पहाटे 5 वाजताच्या सुमारास परिसरात एका झोपडीत आपल्या आजीसह झोपलेल्या एका 5 वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आजीला जाग आल्यामुळे आरोपी बालिकेला उचलून नेण्यास अपयशी ठरला. यात वेळीच आजीने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी घटनास्थळातून पळून गेला.
आणखी एका बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक कबुली
दरम्यान, दुसऱ्या दिवशी आजीने या संदर्भातील पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजचा तपास करून आरोपी श्रवण कुमार यादवला अटक करण्यात यश मिळवले. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने त्याच दिवशी रात्री अशाच पद्धतीने आणखी एका बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक कबुली दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ATM मध्ये फ्रॉड करून पैसे काढणाऱ्याला भंडाऱ्यात अटक, डीबी पथकाची कारवाई
पोलीस स्टेशनसमोरचं असलेल्या गांधी चौकातील अर्बन बँकेच्या एटीएम मशीनची खेळछाड करुन एका टोळीनं हजारो रुपयांची रक्कम काढली होती. ही बाब बँक मॅनेजरच्या लक्षात येताचं तिथं लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीतील एकाला भंडारा पोलिसांच्या डीबी पथकानं शहरातील एका लॉजवरून अटक केली. त्याचे अन्य सहकारी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हरियाणा येथील मोहम्मद अर्शद (३२) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. या टोळीनं भंडारा शहरासह आणखी कुठं कुठं असा एटीएम फ्रॉड केलाय याचा शोध आता भंडारा पोलीस घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Beed Crime News : बीडच्या संतापजनक घटनेची व्याप्ती वाढली, विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील विजय पवार विरोधात आणखी एका पालकाची तक्रार
- मेट्रो स्टेशनकडे जाताना कारमध्ये बसवलं, बंदुकीच्या धाकावर लैंगिक संबंधाची मागणी, नवी मुंबईत धक्कादायक प्रकार, आरोपीवर गुन्हा
























