Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Nagpur Crime News : नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला (Nagpur Crime) करण्यात आलाय.

Nagpur Crime News : नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला (Nagpur Crime News) करण्यात आलाय. या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी (Crime News) झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडलीय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरु केलाय. मात्र या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime : पैशाच्या व्यवहारावरून वाद, नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले. तर मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस सोनू पैलवानचा शोध घेत आहे.
Nagpur Crime : जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी
दरम्यान, जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांच्या पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. धारधार शस्त्राने हा हल्ला केल्याने शिमले गंभीर जखमी झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरातील हि घटना घडलीय. जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी होते. सध्या नितीन शिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
Bhandara : शिवभक्तांचा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात 5 भाविक गंभीर भंडाराच्या गायमुख देवस्थान जवळील घटना
ट्रॅक्टर वरून शिव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टर वरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला शेतात उलटलं. या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील 5 भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थान जवळ घडली. या अपघातानंतर जखमींना परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देत तातडीनं तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या अपघातानंतर गायमुख देवस्थानाकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यात.
























