Nagpur Crime News :नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा परिसरातुनएकअतिशयधक्कादायकआणि मन हेलावून टाकणारी घटना समोरआलीआहे. यातपरिसरातील स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा असून ती मूळची मध्यप्रदेशातील सेलमिया येथील रहिवासी असल्याचीमाहितीआहे. ही घटना 26 डिसेंबरच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. याघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीअसूनपोलीसयाघटनेचाअधिकतपासकरतआहे.
Nagpur Crime News : प्राण्याने शरीराचे लचके तोडले, छाती व दोन्ही हात खाल्ले
मिळालेल्यामाहितीनुसार, घरात मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, परिसरातच छिन्नविछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 6 ते 8 महिन्यांची ही चिमुकली आईच्या कुशीत झोपडीत झोपलेली असताना अज्ञात प्राण्याने तिला उचलून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर अज्ञात प्राण्याने शरीराचे लचके तोडले असून छाती व दोन्ही हात खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.
Nagpur Crime : परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने घटना घडल्याची माहिती
दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, याचा शोध अद्याप सुरू आहे. ठेकेदाराच्या कामासाठी बाहेरगावाहून आलेले मजूर कुटुंबासह या झोपडपट्टीत वास्तव्यास असतानाहिघटनाघडली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून मजूर कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. तरआता सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतेआहे.
Nagpur Crime : हॅाटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्याच्याप्रयत्न; मुलाचा मृत्यू, तर आई गंभीर
नागपूर मधील एका हॅाटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. घटनेत मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमीझाल्याचीमाहितीआहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज असून दोघेही बेंगलूरू येथील रहिवासी आहे. सुरजचं काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुरजच्या पत्नीने बेंगलूरूमध्ये गुरुवारी आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बेंगलूरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते.
दरम्यान बेंगलूरूमध्ये आंदोलन सुरु असताना आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते. दोघांनीही स्थानिक हॅाटेलमध्ये मुक्काम केला होता. याच होटेलमध्ये दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल रॉयलमध्ये हि घटना उघडकीस आलीअसून रात्री 12 वाजताच सूमारास ही घटना घडलीय.
