एक्स्प्लोर

Nagpur Crime News: क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत

Nagpur Crime News: सोसायटीतील डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली होती.

Nagpur Crime News: नागपुरात (Nagpur) कौटुंबिक वादातून 38 वर्षीय महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीतील डान्स क्लासला (Dance Class) जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. गंभीर दुखापतींनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत महिलेचे नाव यामिनी कृष्ण लाल यादव असून आरोपी पतीचे नाव कृष्ण लाल यादव आहे. कृष्ण लाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत.

Nagpur Crime News: डान्स क्लासला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरून घरी परतल्यानंतर त्याने पत्नी यामिनीला स्वतःसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवण्यास सांगितले. मात्र, यामिनी त्यांच्या सोसायटीत असलेल्या डान्स क्लासला जाण्याची तयारी करत होती. यामिनीने स्वयंपाक करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला कौटुंबिक वाद पुढे हिंसक स्वरूपाचा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Nagpur Crime News: मुलांसमोरच पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्ण लाल हा त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने आपल्या दोन मुलांसमोरच यामिनीच्या मानेवर आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर यामिनीला मानेत आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती बिघडत असल्याने तिने पतीकडे पेनकिलर आणण्यास सांगितले.

Nagpur Crime News: औषध आणण्यासाठी गेला, पण दुकान बंद

यामिनीच्या सांगण्यावरून कृष्ण लाल औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानात गेला. मात्र, दुकान बंद असल्याने तो औषध न घेताच घरी परतला. दरम्यान, यामिनीची प्रकृती हळूहळू खालावत गेली. तिच्या पोटावर सूज आली आणि दुखापतींचा त्रास वाढत गेला.

Nagpur Crime News: रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

यानंतर यामिनीला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या शरीरात झालेल्या गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Nagpur Crime News: पोस्टमार्टम रिपोर्टने मारहाणीचा संशय बळावला

शवविच्छेदन अहवालातून यामिनीच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्याचे समोर आले. मानेचे हाड मोडल्याचे, तसेच आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे अहवालात नमूद झाल्याची माहिती आहे. या अहवालानंतर पोलिसांनी कृष्ण लालची चौकशी केली. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कृष्ण लाल यादवविरोधात हत्येचा गुन्हा (Murder) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Pune Crime News: कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget