एक्स्प्लोर

Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद 

Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चोरीच्या गुन्ह्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी शासकीय वैद्यकीय रुग्णलायातून उपचारादरम्यान चक्क पसार झाल्याची घटना घडली आहे.

Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चोरीच्या गुन्ह्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) कैदी शासकीय वैद्यकीय रुग्णलायातून (Government Medical Hospital) उपचारादरम्यान चक्क पसार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 1 वाजून 44 मिनिटांनी ही घटना घडली असून ही घटना रुग्णलायात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हर्ष रामटेके असे पळालेल्या कैद्यांचं नाव आहे. त्याला राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याला दोन दिवसांपूर्वी चक्कर आणि उलटीचा त्रास होत असल्याने नागपूरचा शासकीय वैद्यकीय रुग्णलायत त्याला दाखल करण्यात आले होते.  यावेळी पोलिसांच्या निगराणी खाली असताना, मध्यरात्री संधीचा फायदा घेत तो पसार झाला. 

पुढे आलेल्या माहितीनुसार,  ही घटना घडली त्यावेळी रुग्णलयाचा सुरक्षा रक्षाक बेंचवर बसला असतांना कैदी पळून जाण्यात यशस्वी झालाय. या प्रकरणात अजनी पोलीस ठाण्यात फरार झालेल्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस या फरार कैद्याचा शोध घेत असून त्याला पकडणे हे पोलिसांपुढील पुढचं आव्हान असणार आहे. सध्या पोलिसांनी त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आहे.

मटका बुकीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 33 जणांविरोधात गुन्हा 

तुळजापुरात मटका बुकीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, व्हाट्सअपच्या माध्यमातून हा मटक्याचा जुगार सुरू होता. या प्रकरणी चार आरोपींसह एक लाख 39 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीमध्ये भाजपचे विनोद गंगणे, सचिन पाटील, तर काँग्रेसचे अमोल कुतवळ यांचा समावेश आहे. तर पोलिसांनी रोख रकमेसह लॅपटॉप, प्रिंटर मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या मटका रॅकेटचे इतर जिल्ह्यातही धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता बाळवली आहे. सध्या पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. 

ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्गाने जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना चामोर्शी शहरातील आष्टी- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर घडली. विनोद पुंजाराम काटवे (45), राजू सदाशिव नैताम (45) आणि सुनील वैरागडे (55) सर्व  रा. गडचिरोली असे ठार झालेल्यांची नावे असून अनिल मारोती सातपुते (50) वर्ष, रा. चामोर्शी  हे गंभीर जखमी आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर केले आहे. चारही जण कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यु टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur : NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू
NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू
Manohar Bhosale : भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
Nashik NEET Paper Leak: माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget